23.8 C
Latur
Thursday, August 21, 2025
Homeमहाराष्ट्रधनंजय मुंडेंचे मुंबईत तीन फ्लॅट; करुणा शर्मांचा मोठा दावा

धनंजय मुंडेंचे मुंबईत तीन फ्लॅट; करुणा शर्मांचा मोठा दावा

मुंबई : प्रतिनिधी
मुंबईमध्ये स्वत:चे आलिशान घर असतानाही राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे हे सरकारी निवासस्थान असलेल्या ‘सातपुडा’ या निवासस्थानात रहात असल्याचे समोर आले आहे. मुंबईत आपल्याकडे घर नसल्याने आपण सरकारी निवासस्थानात रहात असल्याची काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडेंनी माध्यमांना माहिती दिली होती. मात्र आता मुंडेंच्या नावे गिरगाव चौपाटी येथील एन. एस. पाटकर मार्गावर वीरभवन इमारतीत घर असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर आता धनंजय मुंडे यांची पहिली पत्नी करुणा शर्मा यांनी मोठा दावा केला आहे.

माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे मुंबईत तीन फ्लॅट असल्याचे करुणा शर्मा यांनी म्हटले आहे.
मलबार हिल, पवई आणि सांताक्रूज येथे तीन फ्लॅट असल्याचा दावा करुणा शर्मा यांनी केला आहे. खोटं बोलून सरकारी बंगल्याचा लाभ घेत असल्याचा दावा करुणा शर्मा यांनी केला आहे. सांताक्रूझ येथील घरी तुम्ही दोघे पती-पत्नी राहण्यासाठी या. मी दुसरीकडे भाड्याने घर घेऊन राहील. मंत्रिपद मिळेल असं वाटत असेल तर ते आता शक्य नाही. तुमची आमदारकीदेखील जाणार असल्याचं करुणा यांनी म्हटलं आहे.

धनंजय मुंडे यांनी जनप्रतिनिधी असताना लाज सोडली आहे, मुंबईमध्ये स्वत:चं घर असताना ते खोट्या गोष्टी सांगत आहेत. ते म्हणतात माझी प्रकृती चांगली नाही. मुलीचं शिक्षण आहे. त्याच्यासाठी मी इथे राहतो. पण धनंजय मुंडे यांचा मलबार हिलमध्ये फ्लॅट आहे. हा सगळ्यांना माहिती आहे. त्यांच्या शपथपत्रामध्ये त्यांनी त्याची माहिती दिली आहे. त्यांचा पवईमध्ये देखील एक फ्लॅट आहे. ज्या फ्लॅटमध्ये मी आत्ता रहात आहे, तो देखील त्यांचाच आहे. तुम्ही मला दिलेला फ्लॅट तुमचाच आहे, माझा फ्लॅट आहे तो पण तुमचाच आहे, त्यामुळे तुम्हाला तुमच्या दुस-या बायकोसोबत राहायला इथे यायचं असेल तर इथे येऊन राहा. आम्ही दुसरीकडे जाऊन राहतो. पण जे शासकीय निवासस्थान आहे ते तुम्ही सोडा, अशी मी तुम्हाला माध्यमांमार्फत एक नोटीस देते आहे.
.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR