19.3 C
Latur
Friday, January 17, 2025
Homeराष्ट्रीयनीट कौन्सिलिंगच्या नावाने कोट्यवधी रुपये उकळले

नीट कौन्सिलिंगच्या नावाने कोट्यवधी रुपये उकळले

मुंबईत भामट्याला अटक, बेळगाव पोलिसांची कारवाई
मुंबई : प्रतिनिधी
नीट कौन्सिलिंग सेंटरच्या नावाखाली नीट परीक्षेत कमी गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांची कोट्यवधींची फसवणूक करणा-या उच्च शिक्षित भामट्याला बेळगावच्या मार्केट पोलिसांनी गजाआड केले. कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा आणि मध्य प्रदेशात या भामट्याने अनेक विद्यार्थी व पालकांची फसवणूक केल्याची माहिती पुढे आली आहे.

देशभरात गाजलेल्या नीट परीक्षा घोळाचे महाराष्ट्र कनेक्शन यापर्ू्वीच उघड झाले असून लातूरमध्ये तिघांना अटकही झाली आहे. सध्या नीट पेपरफुटीचा तपास सीबीआय करीत आहे. त्यातच आता मुंबई पोलिसांनी एमबीए शिक्षित भामट्याला अटक केल्याने खळबळ उडाली आहे. नीट परीक्षेत कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना एमबीबीएसला प्रवेश मिळवून देतो, म्हणून फसवणूक करणा-या आरोपीला मार्केट पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून रोख रक्कम, कॉम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईल, क्रेडिट कार्ड, सीम कार्ड जप्त केल्याची माहिती कायदा सुव्यवस्था विभागाचे पोलिस उपायुक्त रोहन जगदीश यांनी दिली.

या आरोपीचे नाव अरविंद उर्फ अरुणकुमार (४३) असे असून तो मूळचा तेलंगणातील आहे. पोलिसांनी मुंबईतून त्याला अटक केली. नीट परीक्षेत कमी गुण मिळालेले विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांशी संपर्क साधून त्यांना एमबीबीएसला अ‍ॅडमिशन मिळवून देण्याचे आश्वासन अरविंद देत होता. यासाठी त्याने बेळगावात कौन्सिलिंग सेंटरही सुरू केले होते. बेळगावात त्याने कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांकडून १ कोटी ३० लाखांहून अधिक रक्कम उकळली होती. विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांशी बोलण्यासाठी त्याने टेली कॉलरही नेमले होते. फसवणूक झालेल्या एका पालकाने तक्रार दिल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.

सतत बदलायचा सीमकार्ड
अरविंदचा शोध सुरू असताना तो सतत सीम कार्ड बदलत असल्याने त्याला पकडण्यात अडचणी येत होत्या. अखेर त्याच्या कार चालकाच्या लोकेशनवरून मार्केट पोलिसांनी त्याला मुंबई येथे जाऊन अटक केली. अरविंद हा एमबीए असून विद्यार्थ्यांकडून पैसे गोळा केल्यावर तो ऑफिस बंद करून गाव सोडून पलायन करायचा. मुंबईतही त्याने नव्यानेच ऑफिस सुरू केले होते. पण बेळगाव पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्यावर तेलंगणा, महाराष्ट्र, कर्नाटक आणि मध्य प्रदेशात गुन्हे दाखल आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR