29.9 C
Latur
Sunday, September 29, 2024
Homeराष्ट्रीय‘नीट’ पेपर लीक प्रकरणी आरोपींमध्ये नितीश कुमार

‘नीट’ पेपर लीक प्रकरणी आरोपींमध्ये नितीश कुमार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
नीट परीक्षेत पेपर लीक झाल्याप्रकरणी संतप्त विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. हे प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचले असून विद्यार्थ्यांनी न्याय मिळावा यासाठी तीव्र निषेध केला आहे. दुसरीकडे पेपर लीक प्रकरणाचा मास्टरमाईंड असलेल्या नितीश कुमार आणि अमित आनंद यांनी पेपर लीक झाल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणी एकूण चार जणांनी पेपर लीकची कबुली दिली आहे.

नीटच नाही तर याआधीही मी पेपर लीक करत होतो अशी कबुली त्याने दिली आहे. मी वैयक्तिक कामानिमित्ताने सिकंदरला भेटायला गेलो होतो. त्यावेळी माझ्यासोबत नितीश कुमार देखील होता. आम्ही दोघेही तिथे आमचे काम करत असताना पेपर लीक करत असल्याचे सांगितले. त्यावेळी सिकंदरने सांगितले की त्याच्याकडे ‘नीट’ ला बसलेले तीन ते चार विद्यार्थी आहेत. सिकंदरची पोलखोल झाल्यानंतर आम्ही सगळेच अडकणार याची आम्हाला कल्पना होता.

अमितने आपल्या गुन्ह्याची कबुली देताना महत्त्वाचे खुलासे केले आहेत. मी कोणत्याही दबावाशिवाय आणि भीती न बाळगता या सगळ्या गोष्टींची कबुली देत आहे. दानापूर महानगरपालिका कार्यालयात कनिष्ठ अभियंता असलेल्या सिकंदरशी माझी मैत्री होती. काही वैयक्तिक कामानिमित्त मी त्याला भेटायला गेलो होतो.

सिकंदरसोबतच्या भेटीत नितीश कुमारही माझ्यासोबत होता. मी सिकंदरला सांगितले की मी कोणत्याही स्पर्धा परीक्षेचे पेपर लीक करून उमेदवारांना चांगल्या मार्काने पास करतो. यावर सिकंदरने मला सांगितले की, माझ्याकडे ४-५ विद्यार्थी आहेत जे नीट परीक्षेची तयारी करत आहेत, तू त्यांना प्लीज पास कर अशी रिक्वेस्ट त्याने केली.

मुलांना उत्तीर्ण करण्याच्या बदल्यात मी ३०-३२ लाख रुपये लागतील असे सांगितले. यावर सिकंदरने होकार दिला आणि सांगितले की, तो आम्हाला ४ उमेदवारांची नावे देईल. दरम्यान, नीट परीक्षेची तारीख आली. सिकंदरने मुलांना कधी आणायचे विचारले. मी म्हणालो की परीक्षा ५ मे रोजी आहे. ४ मे रोजी रात्री उमेदवारांना घेऊन या. ४ मे च्या रात्री नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटली आणि त्या विद्यार्थ्यांना सर्व उत्तरे सांगून, पाठ करून परीक्षा देण्यासाठी पाठवण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR