पंतप्रधान नरेंद्र मोदी ४ दिवसीय परदेश दौ-यावर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चार दिवसीय परदेश दौ-याला आजपासून (२९ ऑगस्ट) सुरुवात झाली आहे. नरेंद्र मोदी २९ ऑगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत उझबेकिस्तान आणि किर्गिस्तानला या दोन देशांना भेट देणार आहेत. तसंच शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) २६ व्या शिखर परिषदेला नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. यावेळी किर्गिझ प्रजासत्ताकाची राजधानी बिश्केक इथं एससीओ शिखर परिषद आयोजित करण्यात आली आहे.

दरम्यान, आपल्या परदेश दौ-यावर निघण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, सुरक्षा, संपर्क आणि संधी यांवर आधारित असलेल्या एससीओ शिखर परिषदेसाठीच्या भारताच्या दृष्टिकोनाला पुढं नेण्यास आणि दहशतवादाच्या धोक्यापासून मुक्त प्रदेश उभारण्यासाठी सहकारी सदस्यांसोबत मिळून काम करण्यास ते उत्सुक आहेत. उझबेकिस्तान आणि किर्गिझ प्रजासत्ताक या दोन देशांच्या दौ-यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी असाही विश्वास व्यक्त केला की, या दौ-यामुळं मध्य आशियातील भारताची सामरिक भागीदारी अधिक मजबूत होईल. तसंच या प्रदेशासोबतचे सांस्कृतिक संबंध अधिक दृढ होतील.

नरेंद्र मोदी म्हणाले की, ह्याा दौ-यामुळे शांतता, स्थैर्य आणि समृद्धीच्या आपल्या सामायिक ध्येयाला चालना मिळेल. हीच ती मूल्ये आहेत, जी जगासोबतच्या भारताच्या संबंधांच्या केंद्रस्थानी आहेत. याचबरोबर, भारत २०१७ पासून एससीओचा एक सक्रिय आणि रचनात्मक सदस्य राहिला आहे. मी या प्रदेशासाठी भारताच्या दूरदृष्टीला पुढं नेण्यास उत्सुक आहे. जी सुरक्षा, संपर्क आणि संधींवर आधारित आहे. तसंच, मला इतर सदस्यांसोबत मिळून दहशतवाद, फुटीरतावाद आणि अतिरेकीपणाच्या दुष्कृत्यांपासून मुक्त प्रदेश घडवण्यासाठी काम करायचे आहे, जे आपल्या शेजारच्या प्रदेशात आणि त्यापलीकडेही शांतता आणि स्थिरतेला सतत धोका निर्माण करत आहेत.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Jalkot|घागरदऱ्यात हर हर महादेवचा जयघोष; दर्शनासाठी हजारोंची गर्दी
01:40
Video thumbnail
BREAKING : लातूरकरांनो सावधान! मांजरा धरणाची पाणीपातळी चिंताजनक!
02:23
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये शिवसेना उबाठाचा सरकारविरोधात एल्गार! गांधी चौकात होणार महाआंदोलन
04:20
Video thumbnail
Nanded|पाऊस नाही, पिके करपली! शेतकऱ्यांना हेक्टरी ₹५० हजार मदतीची मागणी
01:44
Video thumbnail
Nanded|हातात लग्नाचा बॅनर घेऊन तरुण टॉवरवर! कौटुंबिक त्रासाचा आरोप | लोह्यात खळबळ
00:46
Video thumbnail
Nanded|गणरायाचं विसर्जन करायचं कुठे? नांदेडमध्ये नदी-खदानी कोरड्या | महापालिकेसमोर संकट
02:26
Video thumbnail
Latur|खरगे यांच्या अवमानाविरोधात पुरोगामी संघटना एकवटल्या! गांधी चौकात निषेध सभा
03:14
Video thumbnail
Latur|जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ तरुण टॉवरवर! रेणापूरच्या कोरेगावातील आंदोलन
02:04
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये पिके सुकली! कोरडा दुष्काळ जाहीर करा, राजीव कसबेंची सरकारकडे मागणी
02:05
Video thumbnail
Latur|मातीपासून घडवला गणराया! केशवराज महाविद्यालयात १५० विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम
02:53
Video thumbnail
Nanded|हदगावमध्ये मराठा आरक्षणासाठी एल्गार! शिवसेना आमदाराच्या कार्यालयातच आमरण उपोषण
02:28
Video thumbnail
Latur|एकमत डिजिटलच्या बातमीचा इम्पॅक्ट! लातूरला राज्यस्तरीय खो-खोचे यजमानपद
02:13
Video thumbnail
BIG BREAKING | तिरुका नदीत जळकोटच्या व्यक्तीचा मृतदेह; मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट
00:57
Video thumbnail
SOLAPUR|पडळकरांचा ताफा अडवला! मराठा आंदोलकांचा थेट सवाल; आरक्षणावर आमदारांनी स्पष्ट केली भूमिका
01:42
Video thumbnail
LATUR|गवळणीच्या सुरांनी लातूर दुमदुमलं! वासुदेव समाजाचा जन्माष्टमी सोहळा थाटात
03:55

Latest news