25.9 C
Latur
Wednesday, June 25, 2025
Homeमहाराष्ट्रपुणे रेल्वे स्टेशनचे नामांतर करा

पुणे रेल्वे स्टेशनचे नामांतर करा

मेधा कुलकर्णी यांची मागणी

पुणे : प्रतिनिधी
भाजपाच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुणे रेल्वे स्थानकाच्या नावात बदल करून ‘थोरले बाजीराव पेशवे’ यांचे नाव देण्याची जोरदार मागणी केली आहे.
त्यांच्या या वक्तव्यामुळे पुण्यातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

मेधा कुलकर्णी म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापलेले हिंदवी स्वराज्य पुढे नेण्याचे महान कार्य थोरले बाजीराव पेशवे यांनी केले. त्यांनी अटकपासून ते कटकपर्यंत मराठा साम्राज्य विस्तारले. शनिवारवाडा हे त्या वैभवाचे प्रतीक आहे. त्यामुळे पुणे स्टेशनला त्यांच्या नावाने ओळख दिली पाहिजे.

त्यांनी असंही सांगितले की, रेल्वे स्थानकाच्या डागडुजीदरम्यान या शहराच्या ऐतिहासिक वारशाचे दर्शन घडले पाहिजे. देशभरात विमानतळे आणि स्थानकांवर स्थानिक इतिहासाचं प्रतिबिंब दिसतं, पण पुण्यात ते दिसत नाही. मेधा कुलकर्णी काही दिवसांपूर्वी फलटण येथील यशवंत सहकारी बँक घोटाळ्यामुळेही चर्चेत होत्या. त्यांनी बँकेवर खोटे कर्ज दाखवल्याचा आरोप करत ठेवीदारांची फसवणूक झाल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता त्यांनी पुणे स्टेशनच्या नामांतराची मागणी करून पुन्हा एकदा लक्ष वेधले आहे.

पुणे हे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा असलेलं शहर आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकाच्या नामांतराच्या मागणीकडे राजकीय दृष्टिकोनातूनही लक्ष वेधलं जातं आहे. मेधा कुलकर्णी यांच्या या मागणीनंतर आता विविध राजकीय पक्ष, संघटना आणि नागरी समाज काय भूमिका घेतात, हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR