प्रेमसंबंधात पतीचा अडथळा, बॉयफ्रेंडच्या मदतीने पत्नीने काढला काटा

 सांगली : प्रतिनिधी
पुण्यात केतन हत्या प्रकरण ताजे असतानाच दुसरीकडे सांगलीमधून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रेमसंबंधात अडथळा बनणा-या पतीची पत्नी आणि तिच्या बॉयफ्रेंडने मिळून हत्या केल्याचे समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे पतीच्या हत्येनंतर पत्नीने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी बनाव रचला. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल केला आहे. पोलिस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पल्लवी सर्जे आणि तिचा बॉयफ्रेंड दीपक आजमाने अशी आरोपींची नावे असून मृत व्यक्तीचे नाव आनंदा सर्जे (वय २८) असे आहे. आनंदा सर्जे हे सांगलीतील एका कापड दुकानात काम करत होते. त्याच दुकानात दीपक आजमाने हा तरुणही कामाला होता. याच दरम्यान दीपक आणि आनंदा यांच्या पत्नी पल्लवी सर्जे यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाल्याचे तपासात समोर आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंदा सर्जे यांना दारूचे व्यसन होते. दारूच्या नशेत ते पत्नीला वारंवार मारहाण करत तसेच मानसिक आणि शारीरिक छळ करत असल्याचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर पल्लवी सर्जे आणि तिचा प्रियकर दीपक आजमाने यांनी मिळून आनंदा यांचा काटा काढण्याचा कट रचल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

घटनेच्या दिवशी आनंदा सर्जे यांचा झोपेतच मृत्यू झाल्याचे भासवण्यात आले. कुटुंबीय आणि परिसरातील नागरिकांनाही सुरुवातीला हा नैसर्गिक मृत्यू वाटला. मात्र मृत्यूबाबत काही बाबी संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी तपासाची दिशा बदलली. चौकशीदरम्यान आरोपींच्या जबाबांमध्ये वेगवेगळेपणा आढळून आला. त्यानंतर अधिक तपास आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आनंदा यांचा गळा दाबून खून करण्यात आल्याचे समोर आले.
तपासात पल्लवी आणि दीपक यांनी मिळून हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर दोघांनाही अटक करण्यात आली.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पर्यावरण संरक्षण कायदा ठरतोय कुचकामी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील वातावरण गढूळ...

द्वारकादास शामकुमारतर्फे १८०० वारक-यांची विनामूल्य पंढरपूर वारी 

लातूर : प्रतिनिधी आषाढी एकादशीनिमित्त गेली १५ वर्षांपासुन द्वारकादास शामकुमार...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Udhav Thakre sabha|परभणीत उद्धव ठाकरेंचा एल्गार; बंडखोरांवर थेट हल्लाबोल!
05:46
Video thumbnail
Hingoli|कृषिमंत्र्याच्या प्रतिमेला पैशाचा हार घालून क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अनोखे आंदोलन
00:57
Video thumbnail
Sanjay Jadhav On Sanjay Raut|"हम तो इतने बेशरम हैं..." म्हणत जाधवांचा राऊतांवर निशाणा
04:28
Video thumbnail
Rain Update|लातूरमध्ये मुसळधार पावसाची दमदार बॅटिंग; उकाड्यापासून दिलासा
02:33
Video thumbnail
Latur Railway Update|खासदार शिवाजी काळगे यांचा मोठा दावा; लवकरच नवी लातूर–मुंबई रेल्वे
02:16
Video thumbnail
लातुरात विजांच्या कडकडाटासह पावसाची जोरदार हजेरी #marathilivenews #maharashtranews
03:01
Video thumbnail
Babasaheb patil on karjmukti|कर्जमाफीवर अखेर सरकारचं मौन तुटलं; सहकार मंत्र्यांचा मोठा दावा!
03:53
Video thumbnail
Latur|लातूरच्या नाट्यप्रेमींसाठी गुड न्यूज! नाट्यगृहाचे काम पुन्हा मार्गी
03:19
Video thumbnail
TET परीक्षा पेपरफुटीच्या निषेधार्थ परभणीत अभाविपचे तीव्र आंदोलन #marathilivenews
00:10
Video thumbnail
खासदार संजय जाधव यांनी पक्ष सोडल्यानंतर परभणीत उद्धव ठाकरे यांचं जंगी स्वागत #marathilivenews
00:53
Video thumbnail
LIVE-बंडखोरी नंतर उद्धव ठाकरे यांची यवतमाळ येथून पहिली जाहीर सभा
45:42
Video thumbnail
Latur|शेतकऱ्यांच्या पीकविम्यावरून शिवसेना आक्रमक; आंदोलनाचा इशारा
05:07
Video thumbnail
Latur|अवैध दारूविरोधात महिलांचा एल्गार; विक्रेत्याच्या घरात घुसून मारहाण!
03:05
Video thumbnail
Latur|लातूर DPC बैठकीत अनेक अधिकारी गैरहजर;पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश
02:53
Video thumbnail
LIVE-बंडखोरी नंतर उद्धव ठाकरे यांची यवतमाळ येथून पहिली जाहीर सभा
00:00

Latest news