मराठा आरक्षणाचा ईडब्ल्यूएस प्रवर्गाला मोठा फटका; प्रवेशात १५ टक्के घट

मुंबई : मराठा आरक्षणाचा तिढा अद्यापही मार्गी लागलेला नाही. इतर मागास प्रवर्गातून, ओबीसीतून आरक्षण मिळण्यासाठी संघर्ष सुरूच आहे. दरम्यान राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या (सीईटी कक्ष) अहवालातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यानुसार मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना सामाजिक आणि आर्थिक मागास प्रवर्गातून अभियांत्रिकी, वैद्यकीय, विधी आणि कृषी शाखेतील अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यात येत आहे. तर त्याचवेळी इतर मागास प्रवर्गातूनही काहींचे अर्ज दाखल झाले आहेत. त्याचा फटका ईडब्ल्यूएस प्रवर्गाला बसला आहे. या प्रवर्गातील १५ टक्क्यांनी घट झाल्याचा दावा करण्यात येत आहे.

मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय प्रवर्गातून (एसईबीसी) प्रवेश देण्याचा निर्णय यापूर्वी फडणवीस सरकारच्या काळात घेण्यात आला होता. त्याचा परिणाम आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकामधील प्रवर्गातील (ईडब्ल्यूएस) प्रवेशावर दिसत आहे. एसईबीसीमुळे ईडब्ल्यूएस प्रवर्गातील प्रवेशांवर परिणाम झाला. प्रवेशांमध्ये गेल्या तीन वर्षांमध्ये १५ टक्क्यांनी घट झाली आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने याविषयीचा अहवाल उच्च व तंत्रशिक्षण विभागाला सादर केला. त्यात ही धक्कादायक बाब समोर आली.

सीईटी कक्षाने जो अहवाल उच्च व तंत्रशिक्षण विभागाला सादर केला. त्यानुसार, २०२३-२४ मध्ये राज्यात ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी ११ हजार १८४ जागा होत्या. या जागांवर ७ हजार ३५२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. प्रवेशाची टक्केवारी ६५.७४ टक्के इतकी होती. तर २०२४-२५ मध्ये जागांची संख्या १२ हजार ७०४ झाली. यावेळी जागा वाढल्या. मात्र प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली.

२०२४-२५ मध्ये ७ हजार २७६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये ईडब्ल्यूएस प्रवर्गात १ हजार ६८९ इतक्या जागा वाढल्या आहेत. आता उपलब्ध जागांची संख्या १४ हजार ३९३ इतकी वाढली आहे. तर दुसरीकडे प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांची संख्या ३५ ने घटली. २०२५-२६ मध्ये ७ हजार २४१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. तीन वर्षांमध्ये ईडब्ल्यूएस प्रवर्गातून प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांची संख्या १११ ने कमी झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. तर दुसरीकडे ईडब्ल्यूएससाठी उपलब्ध जागांची संख्या सातत्याने वाढली आहे. प्रवेशाची टक्केवारी ६५.७४ वरून ५०.३१ टक्क्यांवर घसरली आहे. अनेक विद्यार्थी एसईबीसी ऐवजी आता ईडब्ल्यूएस पर्याय निवडत असल्याने हा परिणाम झाल्याचा दावा करण्यात येत आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44
Video thumbnail
Nanded|: 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन
03:29
Video thumbnail
Latur|जळकोट तालुक्यात जलस्रोत तुडुंब; पाण्याचा प्रश्न मिटला, शिवार हिरवाईने नटले
01:14
Video thumbnail
Solapur| मोहोळमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
01:19
Video thumbnail
Latur|नांदेड–बिदर महामार्गावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा; अपघाताचा धोका
00:59
Video thumbnail
Latur|शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाची तयारी; चार दिवसांत मोठा निर्णय!
03:22
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21
Video thumbnail
Nanded|नांदेड हादरलं! दहावीतील विद्यार्थ्याचा वर्गमित्रावर चाकू हल्ला
02:10
Video thumbnail
भूम तालुक्यातील आंबी जयवंतनगर मार्ग बंद;देवगावरोड वरील पूल गेला वाहून,अनेक गावांचा संपर्क तुटला
00:17
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये प्रशासनाचा बुलडोझर; उमर चौक अतिक्रमणमुक्त
01:29

Latest news