17.9 C
Latur
Wednesday, November 20, 2024
Homeमहाराष्ट्रमस्ती आली का? एका मिनिटात गायब करेन

मस्ती आली का? एका मिनिटात गायब करेन

संजय शिरसाटांची ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना दमदाटी

छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कार्यकर्त्याला दम दिल्याचा प्रकार समोर आला आहे. झेंडा उंचावून घोषणा देणा-या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याला शिरसाटांनी ‘मस्ती आली का? एका मिनिटात गायब करेन’ अशा शब्दात दटावले. छत्रपती संभाजीनगर येथील उस्मानपुरा भागामध्ये शिंदे गट आणि ठाकरे गटाचा बूथ समोरासमोर आहे.

आमदार संजय शिरसाट बूथवर दाखल झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या. यावेळी समोर असलेल्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी देखील झेंडा उंचावत घोषणा दिल्या. यावेळी संजय शिरसाट ठाकरे गटाच्या बूथवर गेले आणि त्यांनी कार्यकर्त्याला मस्ती आली का? एका मिनिटात गायब करेन, असं म्हणत दम दिला. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ मोबाईल कॅमेरामध्ये रेकॉर्ड झाला असून तो समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे.

संजय शिरसाट हे औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) पश्चिम विधानसभा मतदारसंघातून महायुतीतर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे उमेदवार आहेत. त्यांच्याविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून राजू शिंदे रिंगणात उतरले आहेत.

संजय शिरसाट यांनी. २००९ पासून सलग तीन वेळा त्यांनी आमदारकी भूषवली आहे. यावेळी चौथ्यांदा ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात शिरसाट यांच्या नावाची चर्चा होती. शिरसाट मंत्रिपदासाठी उत्सुकही होते, मात्र त्यांना हुलकावणी मिळाली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR