माझा महाराष्ट्र, भगवा महाराष्ट्र उपक्रमांतर्गत पक्ष संघटन मजबूत करा 

लातूर : प्रतिनिधी
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या ‘माझा महाराष्ट्र, भगवा महाराष्ट्र’ या उपक्रमांतर्गत लातूर जिल्ह्यात पक्षसंघटन अधिक भक्कम आणि व्यापक करण्यासाठी सर्व पदाधिका-यांनी ताकदीने कामाला लागावे, असे आवाहन शिवसेनेचे लातूर जिल्हा संपर्कप्रमुख तथा माजी आमदार रोहिदास चव्हाण यांनी केले.
येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित केलेल्या बैठकीत लातूर शहर, लातूर ग्रामीण, निलंगा, औसा विधानसभा मतदारसंघातील पक्षाच्या पदाधिका-यांच्या विशेष बैठकीत ते बोलत होते. रोहिदास चव्हाण पुढे म्हणाले की, पक्षाची ताकद तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने १ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट दरम्यान शिवसेनेचा झंझावात-महाराष्ट्र व्यापी मोहीम आयोजित करण्यात आली आहे. सदर कार्यक्रमांतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात संघटनात्मक बांधणीवर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. गाव तिथे शाखा आणि घर तिथे शिवसैनिक हे उद्दिष्ट समोर ठेवून काम करणे गरजेचे आहे.
या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, सहसंपर्कप्रमुख प्रमुख चंद्रनाथ मुरळीकर, जिल्हा समन्वयक पप्पु कुलकर्णी, जिल्हा परिषद सदस्य तानाजी जाधव, उपजिल्हाप्रमुख बालाजी जाधव, महिला जिल्हा संघटक जयश्रीताई उटगे, डॉ. शोभाताई बेंजरगे, महानगर प्रमुख विष्णुपंत साठे, शहरप्रमुख माधव कलमुकले, शिवराज मुळावकर, युवासेना जिल्हा अधिकारी दिनेश जावळे, औशाचे उपजिल्हाप्रमुख बजरंग जाधव, मुरूडचे  बाळासाहेब डोंगरे, अविनाश रेशमी, भागवत वंगे, देवणी तालुका प्रमुख मुकेश सुडे, ग्रामीण तालुका प्रमुख कैलाश पाटील, तालुका प्रमुख शंकर रांजणकर, शिवसैनिक देविदास भोसले, महादेव भोसले, अ‍ॅड. चंद्रकांत भोसले, त्र्यंबक स्वामी, राजेंद्र कतारे, विष्णु कांबळे, यांच्यासह शिवसैनिक, पदाधिकारी उपस्थित होते.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44
Video thumbnail
Nanded|: 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन
03:29
Video thumbnail
Latur|जळकोट तालुक्यात जलस्रोत तुडुंब; पाण्याचा प्रश्न मिटला, शिवार हिरवाईने नटले
01:14
Video thumbnail
Solapur| मोहोळमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
01:19
Video thumbnail
Latur|नांदेड–बिदर महामार्गावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा; अपघाताचा धोका
00:59
Video thumbnail
Latur|शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाची तयारी; चार दिवसांत मोठा निर्णय!
03:22
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21
Video thumbnail
Nanded|नांदेड हादरलं! दहावीतील विद्यार्थ्याचा वर्गमित्रावर चाकू हल्ला
02:10
Video thumbnail
भूम तालुक्यातील आंबी जयवंतनगर मार्ग बंद;देवगावरोड वरील पूल गेला वाहून,अनेक गावांचा संपर्क तुटला
00:17
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये प्रशासनाचा बुलडोझर; उमर चौक अतिक्रमणमुक्त
01:29
Video thumbnail
Viral Video: सहस्त्रकुंड धबधब्याचा मन मोहून टाकणारा ड्रोन व्ह्यू
01:28

Latest news