क्या बोलती पब्लिक?, अभियान राबविणार

छ. संभाजीनगरमध्ये सीजेपीची घोषणा

६० टक्के तरुणांचे
प्रश्न केंद्रस्थानी आणू
छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा देण्यास भाग पाडत सरकारला नमवल्यानंतर कॉकरोच जनता पार्टीने आता आपल्या आगामी देशव्यापी रणनीतीची घोषणा केली. आमचा लढा केवळ एका राजीनाम्यापुरता मर्यादित नव्हता. येत्या सप्टेंबर महिन्यापासून सीजेपी देशभरात क्या बोलती पब्लिक, ही विशेष मोहीम राबवून देशातील ६० टक्के तरुणांचे प्रश्न थेट केंद्रस्थानी आणणार आहे, अशी घोषणा सीजेपीचे प्रमुख अभिजीत दीपके यांनी केली.

कॉकरोच जनता पार्टीच्या २ दिवसीय राष्ट्रीय कोअर कमिटी बैठकीचा समारोप आज पार पडला. त्यानंतर ​पुढील आंदोलनाची आणि संघटनात्मक बांधणीची आखणी करताना सीजेपीने जॉईन द मुव्हमेंट, जॉईन सीजेपी हे नवे अभियान लॉन्च केले. सीजेपीचे नेते सौरभ दास यांनी पत्रकार परिषदेत अधिकृत क्यूआर कोड जारी करत देशातील जास्तीत जास्त तरुणांना या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले. आम्ही राजकीय पक्ष काढणार नसून, सरकारवर व राजकीय पक्षांवर सतत दबाव आणणारा पब्लिक प्रेशर ग्रुप म्हणून गल्लीपासून दिल्लीपर्यंत काम करणार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.

सप्टेंबर महिन्यात क्या बोलती पब्लिक मोहिमेत सीजेपीची टीम देशातील विविध राज्यांत आणि गावांत फिरून तरुणांशी संवाद साधणार आहे. पहिली-दुसरीच्या मुलांची १-१ लाख रुपये फी, कॉलेजेसमध्ये २५ लाख रुपयांचा मॅनेजमेंट कोटा आणि पदव्या हातात असूनही डिलिव्हरी बॉय म्हणून काम करण्याची तरुणांची मजबुरी…या शिक्षण धंद्याविरोधात आणि बेरोजगारीविरोधात सीजेपी आता थेट रस्त्यावर उतरून मोठा दबाव निर्माण करेल, असा थेट इशारा अभिजीत दिपके यांनी दिला.

आता ​५ झोनमध्ये
देशव्यापी संघटन
सीजेपीच्या नव्या रणनीतीनुसार संपूर्ण देशाची ५ मुख्य भागांत विभागणी करून संघटन बांधणी केली जाणार आहे. ​आशुतोष रांका यांनी दिलेल्या माहितीनुसार रत्ना सिंग यांच्याकडे कायदेशीर बाबींची जबाबदारी असेल तर वैष्णवी गौर या धोरणात्मक निर्णय निश्चित करतील.

जनतेच्या सहभागातून
निधी गोळा करणार
आंदोलनासाठी लागणारा निधी हा कुठल्या बड्या राजकीय पक्षाकडून किंवा उद्योजकाकडून न घेता जनतेच्या सहभागातून गोळा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सीजेपीने घेतला.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44
Video thumbnail
Nanded|: 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन
03:29
Video thumbnail
Latur|जळकोट तालुक्यात जलस्रोत तुडुंब; पाण्याचा प्रश्न मिटला, शिवार हिरवाईने नटले
01:14
Video thumbnail
Solapur| मोहोळमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
01:19
Video thumbnail
Latur|नांदेड–बिदर महामार्गावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा; अपघाताचा धोका
00:59
Video thumbnail
Latur|शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाची तयारी; चार दिवसांत मोठा निर्णय!
03:22
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21
Video thumbnail
Nanded|नांदेड हादरलं! दहावीतील विद्यार्थ्याचा वर्गमित्रावर चाकू हल्ला
02:10
Video thumbnail
भूम तालुक्यातील आंबी जयवंतनगर मार्ग बंद;देवगावरोड वरील पूल गेला वाहून,अनेक गावांचा संपर्क तुटला
00:17
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये प्रशासनाचा बुलडोझर; उमर चौक अतिक्रमणमुक्त
01:29
Video thumbnail
Viral Video: सहस्त्रकुंड धबधब्याचा मन मोहून टाकणारा ड्रोन व्ह्यू
01:28

Latest news