राज्यात धर्मांतरविरोधी कायदा लागू

बेकायदेशीर धर्मांतर केल्यास कठोर कारवाई
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची मंजुरी मिळाल्यानंतर आणि अधिकृत राजपत्रात (गॅझेट) प्रकाशित झाल्यानंतर राज्यात धर्मांतरविरोधी कायदा-महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा, २०२६ आता राज्यात लागू झाला. हा कायदा ३० जुलै रोजी अधिकृत राजपत्रात प्रकाशित झाला आणि त्याच तारखेपासून तो अंमलात आला. एका वरिष्ठ अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार आता राज्यात बेकायदेशीर धर्मांतराच्या प्रकरणांत नवीन कायद्यातील तरतुदींनुसार कठोर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.

राज्य विधिमंडळाने मार्चमधील अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा कायदा मंजूर केला होता आणि त्यानंतर तो मंजुरीसाठी राज्यपाल व नंतर राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आला होता. हा कायदा बळजबरी, फसवणूक, आमिष, चुकीची माहिती किंवा लग्नाचे आश्वासन देऊन केल्या जाणा-या धर्मांतरास प्रतिबंध करतो. या कायद्याचे उल्लंघन केल्यास ७ वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद आहे तर पुन्हा गुन्हा करणा-यांसाठी ही शिक्षा १० वर्षांपर्यंत वाढू शकते. धर्मांतरापूर्वी जिल्हा दंडाधिका-यांना ६० दिवस आधी सूचना देणे यात अनिवार्य करण्यात आले आहे; तसेच धर्मांतरित व्यक्तीचे पालक, भावंडे आणि इतर नातेवाईक यांना तक्रार करण्याचा अधिकारही यात देण्यात आला आहे.

विधानसभेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी), समाजवादी पक्ष आणि सीपीआय (एम) यांनी या विधेयकाला विरोध केला होता. मात्र, शिवसेनेने (ठाकरे गट) त्याला पाठिंबा दिला होता. काँग्रेसच्या आमदारांनी विधानसभेत असा युक्तिवाद केला होता की, हा कायदा घटनाबा असून तो गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन करणारा आहे. समाजवादी पक्षाचे म्हणणे होते की, हा कायदा एका विशिष्ट समुदायाला लक्ष्य करण्यासाठी आणला गेला. विरोधकांची अशी मागणी होती की, हे विधेयक संयुक्त निवड समितीकडे पाठवले जावे.

जबरदस्तीने होणारे
धर्मांतर रोखले जाणार
या कायद्याचे समर्थन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले, बळजबरीने किंवा फसवणूक करून होणा-या धर्मांतराला आळा घालणे हा याचा उद्देश आहे; स्वेच्छेने होणारे धर्मांतर किंवा आंतरधर्मीय विवाह यांना लक्ष्य करणे हा याचा उद्देश नाही. मध्य प्रदेश, ओडिशा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश आणि हिमाचल प्रदेश यांसारख्या किमान १२ राज्यांमध्ये यापूर्वीच धर्मांतर-विरोधी कायदा अस्तित्वात आहे.

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर
देणार कोर्टात आव्हान
वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी आम्ही धर्मांतरविरोधी कायद्याला कोर्टात चॅलेंज करणार आहोत. मुंबई हाय कोर्टात याला चॅलेंज करू, असे सांगितले. या कायद्याला राज्यातील विरोधी पक्षांनीही आवाज उठविला. परंतु सरकार एक एक कायदे बदलत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
भूम तालुक्यातील आंबी जयवंतनगर मार्ग बंद;देवगावरोड वरील पूल गेला वाहून,अनेक गावांचा संपर्क तुटला
00:17
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये प्रशासनाचा बुलडोझर; उमर चौक अतिक्रमणमुक्त
01:29
Video thumbnail
Viral Video: सहस्त्रकुंड धबधब्याचा मन मोहून टाकणारा ड्रोन व्ह्यू
01:28
Video thumbnail
Latur|९ ऑगस्टला नांदेडमध्ये शेतकऱ्यांचा महाएल्गार; आंदोलनाची दिशा ठरणार
01:57
Video thumbnail
Latur|भ्रष्टाचाराचा 'अंत' करण्यासाठी शेतकऱ्यांची अंत्ययात्रा! शिरूर अनंतपाळमध्ये अनोखे आंदोलन
01:26
Video thumbnail
Latur|बोगस बियाण्यांवरून रघुनाथदादा पाटील आक्रमक; कृषी कार्यालयात ठिय्या
05:21
Video thumbnail
Latur|जलजीवन मिशनची अपूर्ण कामे; ग्रामस्थांचे 'भिक मांगो' आंदोलन
01:58
Video thumbnail
Latur|पेपरफुटी प्रकरणांवर संभाजी ब्रिगेड आक्रमक; सरकारविरोधात धरणे आंदोलन
04:51
Video thumbnail
Nanded|'नाना पटोले यांना गुरू मानतो'; पाद्यपूजनावर काँग्रेस कार्यकर्त्यांचे स्पष्टीकरण
06:36
Video thumbnail
Latur|लातूर LCB ची धडाकेबाज कारवाई; घरफोडी प्रकरणाचा मोठा खुलासा
01:06
Video thumbnail
Latur|वडवळमध्ये घाणीचं साम्राज्य; ग्रामस्थांचा संताप
01:39
Video thumbnail
Purna|५० वर्षांचा गौरवशाली प्रवास! पूर्ण्यात जवाहरलाल नेहरू इंग्लिश स्कूलचा सुवर्ण महोत्सव
01:48
Video thumbnail
Latur|हैदराबादपेक्षाही भव्य? लातुरात उभारला जाणार 'स्टॅच्यू ऑफ नॉलेज'
02:14
Video thumbnail
Latur|एकमत डिजिटलच्या बातमीचा परिणाम; लातूरची सिटी बस सेवा पुन्हा सुरू
03:24
Video thumbnail
Latur|साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
02:14

Latest news