लातूर : प्रतिनिधी
येथे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ मुलींची राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेस दि. २७ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.३० पासून प्रारंभ झाला.
पहिल्या दिवशी बिकानेर विद्यापीठ, राज्यस्थान विरुद्ध सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे. सयाजीराव गायकवाड विद्यापीठ, बडोदे ( गुजरात) विरुद्ध जिवाजी विद्यापीठ, ग्वालेर. मोहनलाल सुकार्य विद्यापीठ, उदयपूर विरुद्ध यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक. राणी दुर्गावती विद्यापीठ जयपूर विरुद्ध राजस्थान विद्यापीठ, कोटा. विक्रम विद्यापीठ उज्जैन विरुद्ध मारवाडी विद्यापीठ राजकोट यांच्या मध्ये आज स्पर्धा झाल्या आहेत.
या स्पर्धेचे सुरूवात शिव छत्रपती शिक्षण संस्थेचे सहसचिव गोपाळ शिंदे यांच्या हस्ते क्षीफळ फोडून करण्यात आले. या स्पर्धेतील खेळाडूंना शुभेच्छा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे, उपप्राचार्य प्रा. सदाशिव शिंदे, क्रीडा विभागप्रमुख डॉ. अनिरुध्द बिराजदार यांनी दिल्या. या स्पर्धेत सरपंच म्हणून मेहराज पठाण, सफर पठाण, विशाल सोनवणे, शाकीर शेख तर पंच म्हणून संजय कांबळे कमलेश पाटील आदीं कार्य करत आहेत. या सर्व स्पर्धा राजर्षी शाहू महाविद्यालयाचे क्रीडा संकुलन, संत तुकाराम मॉडेल स्कूल समोर, हरंगुळ रेल्वे स्टेशन, बार्शी रोड, लातूर येथे होत आहेत.

