दिल्ली : अभिषेक शर्मा सर्वात जलद टी-२० शतक झळकावणारा भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याने अफगाणिस्तानविरुद्ध ३० चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले. अभिषेकने रोहित शर्माचा विक्रम मोडला. रोहितने २०१७ मध्ये ३५ चेंडूंमध्ये शतक केले होते.
अफगाणिस्तानविरुद्धच्या तिस-या टी-२० सामन्यात भारताने ९ षटकांत एकही गडी न गमावता १३४ धावा केल्या आहेत. अभिषेक ३१ चेंडूंमध्ये १०१ धावांवर खेळत आहे. त्याने ९ चौकार आणि १० षटकार मारले आहेत. संजू सॅमसनने २३ चेंडूंमध्ये ३३ धावा केल्या आहेत. यापूर्वी भारताने पॉवरप्लेमध्ये एकही गडी न गमावता १०० धावा करून आपली सर्वोच्च धावसंख्या नोंदवली होती.
















