लातूरच्या फटाके बाजारावर दुष्काळाची छाया

लातूर : प्रतिनिधी
दिपावलीचा सण अवघ्या दोन दिवसांवर येवून ठेपला आहे. यावर्षी अत्यल्प पावसामुळे त्याचा परिणाम फटाके बाजारावर दिसून येत आहे. लातूर शहराच्या फटाके बाजारपेठेत फटाके खरेदीसाठी ग्राहकांची रेलचेल म्हणावी तशी दिसून येत नाही. दिपावलीच्या सणात गोडधोड बरोबरच लहान, थोरांना फटाक्यांचेही आकर्षण आहे. बाजारात झाड, हेलीकॅप्टर, लसून, बिडीबाँम बरोबरच फॅन्सी फटाकेही सर्वाचे लक्ष वेधून घेत आहेत.
प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी शहरातील श्री मारवाडी राजस्थान विद्यालयाच्या पाठीमागील मैदानात फटाके बाजार भरला आहे. या बाजारात मोठ्या प्रमाणात फटाक्यांचे स्टॉल्स लावण्यात आले आहेत. यावर्षी एल निनोमुळे जिल्हयात सरारीच्या ५१ टक्के इतका पाऊस झाल्याने जिल्हयात दुष्काळी परिस्थीती आहे. खरीप हंगामातील पिक शेतक-यांच्या हातात आले नसल्याने बाजाराची चेन विस्कळीत झाली आहे. याचा परिणाम फटाके बाजाराच्या बरोबरच इतर खरेदीवर दिसून येत आहे.
यावर्षी फटाके बाजारात ग्राहकांना आकर्षीत लसून, विविध प्रकारच्या फूलझाडी, अ‍ॅटम बॉम, बिडीबॉम, फॅन्सी फुलबाज्या, सुतळी बँब, भुईचक्र सध्या सर्वाचे अकर्षण ठरत आहेत.लातूरच्या फटाके बाजारात शिवकाशी (तामिळनाडू) येथील प्रसिध्द फटाके ग्राहकांच्या पसंतीस पडतील असे विक्रीसाठी आले आहेत.
यात लक्ष्मी तोटे ३०० ते १००० रूपयांना बॉक्स, सुतळी बाँब ५० ते १ हजार रूपये पॅकेट, कुग फूट बाँम १ हजार रूपये पॅकेट, एके ४७ बाँब ५०० रूपये, रेघाळी फटाके २० ते २०० रूपये पुडा, फुलबाजी २० ते २५ प्रकारच्या २० ते ५०० रूपये पॅकेट, भूईनळा १० ते १ हजार रूपये पॅकेट, भुईचक्र १५० ते ५०० रूपये पॅकेट, लसून बॉक्स ३०० रूपये, मोठे तोटे ३०० ते १००० रूपये, १ हजार फटाकडयांची लढ २०० ते ४०० रूपये, हेलीकॅप्टर १०० ते ४०० रूपये, बिडीबॉम १० ते ३० रूपये, बरोबरच टिकली रोल २० ते ३० रूपये, बंदूक, बाजार पेठेत विक्रीस आल्या आहेत.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
LIVE -लातूर जिल्हा बँक निवडणुकीत सहकार पॅनलचा शंखनाद! बाबासाहेब पाटील, धीरज देशमुख मैदानात
01:40:24
Video thumbnail
LIVE "लातूर बँकेत मोठी राजकीय खेळी! बाबासाहेब पाटील अन् धीरज देशमुख एकत्र!"
01:03:28
Video thumbnail
Mahur|एमटीडीसी रस्ते बांधकामावर भीषण दुर्घटना | २० वर्षीय मजुराचा मिक्सर मशीनखाली मृत्यू
01:33
Video thumbnail
Latur|कुरियर बॉक्स स्फोटातील नागनाथ स्वामी यांचा मृत्यू | पाच दिवसांची झुंज संपली
02:44
Video thumbnail
Latur|मनपात स्वच्छता कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन | किमान वेतन आणि दिवाळी बोनसची मागणी
03:57
Video thumbnail
Latur Diwali Travel Ticket Rates|खासगी बसकडून अवाजवी तिकीट दर आकारल्यास तक्रार करा | RTO चे आवाहन
02:55
Video thumbnail
Latur Loan Recovery|कर्जवसुलीच्या छळातून आत्महत्येचा आरोप; सावकार शहाणवाज पठाण अटकेत
03:39
Video thumbnail
Nanded Loan Recovery|दुष्काळात कर्जवसुलीला छावा संघटनेचा विरोध | चिंचोली गावातील घटना
04:55
Video thumbnail
Latur|कुरियर बॉक्स स्फोट प्रकरणात बंदूक घर मालकाला अटक | दोन कुरियर चालक आरोपी
02:25
Video thumbnail
Latur News|गांधी चौक पोलिसांनी शोधले १४ हरवलेले मोबाईल | CEIR पोर्टलची मदत
02:23
Video thumbnail
Latur News : मालमत्ता कर थकबाकीदारांवर मनपाची कडक कारवाई; 80% सवलतीचा आज शेवटचा दिवस
01:52
Video thumbnail
Latur Police Action mod| गंजगोलाईत वाहतूक कोंडी रोखण्यासाठी पोलिसांचा रूट मार्च
05:39
Video thumbnail
Latur Hockey News : राज्यस्तरीय स्पर्धेस पात्र मुलींच्या हॉकी संघाला ‘माझं लातूर’चे पाठबळ
02:03
Video thumbnail
Latur Bus Stand : बसस्थानकातील सुरक्षेवरून महिला शिवसैनिक आक्रमक; पोलीस नियुक्तीची मागणी
01:39
Video thumbnail
Latur News : लातुरात गोवा बनावटीच्या दारूचा पर्दाफाश; 19 लाखांचा मुद्देमाल जप्त
03:38

Latest news