34.9 C
Latur
Thursday, April 25, 2024
Homeलातूरलातूर फिजिओथेरपीचा निकाल १०० टक्के

लातूर फिजिओथेरपीचा निकाल १०० टक्के

औसा : प्रतिनिधी
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक अंतर्गत घेण्यात आलेल्या हिवाळी परीक्षा २०२३ चा निकाल जाहीर झाला असून श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचलित एसव्हीएसएस लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी महाविद्यालयाच्य अंतिम वर्षाचा निकाल शंभर टक्के लागला असून सर्व विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्ताीर्ण झाले आहेत.

महाविद्यालयातील कु.आचल गारजरे हीने ६२. ५ गुण घेऊन प्रथम येण्याचा मान पटकावला आहे तर कु. साक्षी बोरकुटे हिने ६१. ८९ गुण घेऊन द्वितीय आली आहे. या ही वर्षी महाविद्यालयाची गुणवंत विद्यार्थ्यांची परंपरा राखली आहे. या गुणवंत वद्यिार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष भीमाशंकर बावगे ,सचिव वेताळेश्वर बावगे, कोषाध्यक्ष शिवंिलंग जेवळे, संचालक नंदकिशोर बावगे, प्राचार्य डॉ. वीरेंद्र मेश्राम, प्राचार्या डॉ. श्यामलीला जेवळे, प्राचार्य डॉ श्रीनिवास बुमरेला, डॉ. पल्लवी तायडे, डॉ. पवनकुमार, डॉ. आरणिका राजपुरिया, डॉ. शारदा धाडे, डॉ.अखिलेश बीवाळकर तसेच लातूर कॉलेज ऑफ फार्मसी लातूर, लातूर कॉलेज ऑफ फार्मसी हासेगाव, राजीव गांधी इन्स्टीट्यूट हासेगाव, लातूर कॉलेज ऑफ सायन्स ,लातूर कॉलेज ऑफ आयटीआय, ज्ञानसागर विद्यालय हासेगाव, गुरुनाथप्पा बावगे इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल या सर्व युनिटच्या प्राचार्य, शिक्षकांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR