34 C
Latur
Friday, May 10, 2024
Homeलातूरकारेवाडी, गणेशवाडीची पथकाकडून पाहणी

कारेवाडी, गणेशवाडीची पथकाकडून पाहणी

शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
आर आर पाटील स्मार्ट ग्राम अभियान अंतर्गंत स्मार्ट ग्राम साठी तालुक्यातील कारेवाडी, गणेशवाडी व साकोळ या तीन गावांची स्मार्ट ग्राम अभियानाच्या पथकाकडून तपासणी करण्यात आली. या दरम्यान संबंधित गावच्या सरपंच, ग्रामसेवकांनी गावात झालेल्या विविध विकास कामांची माहिती स्मार्टग्राम पथकाला दिली तर विकास कामांबाबत पथकाने समाधान व्यक्त केले.

तालुक्यातील कारेवाडी गणेशवाडी व साकोळ या तीन गावांची स्मार्ट ग्रामसाठी अहमदपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमोल कुमार आंदेलवाड यांच्या अध्यक्षतेखालील विस्तार अधिकारी रवींद्र साचने, धनाजी सुळे,जी.आर.कनाके,गंगाराजू ऐनलावार यांच्या पथकाकडून पाहणी करण्यात आली. या दरम्यान आर आर पाटील स्मार्ट ग्राम या योजनेत सहभागी झालेल्या कारेवाडी गणेशवाडी व साकोळ येथील ग्रामपंचायतची पाहणी करताना वैयक्तिक शौचालय सुविधा व त्याचा वापर, पाणी गुणवत्ता तपासणी, घरगुती नळ जोडणे, सांडपाणी व्यवस्थापन, कचरा घनकचरा व्यवस्थापन,पायाभूत सुविधांचा विकास,आरोग्य शक्षिण विषयक सुविधांची उपलब्धी, केंद्र शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी, बचत गट, प्लास्टिक वापर बंदी, पाणीपट्टी व पथदिवे बिल नियमितपणे भरणे, वृक्ष लागवड, जलसंधारण याबाबत ग्रामपंचायतीने केलेल्या उपक्रमाची पाहणी पथकाकडून करण्यात आली.

याप्रसंगी शिरूर अनंतपाळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बी.टी. चव्हाण, विस्तार अधिकारी दिनकर व्होट्टे, विनोद कल्लेकर, साकोळ सरपंच कमलाकर मादळे, उपसरपंच राजकुमार पाटील, ग्रामसेवक शिवराज एकोर्गे, कारेवाडी सरपंच खंडेराव पाटील, ग्रामसेविका राजे, गणेशवाडी सरपंच नारायणपुरे, ग्रामसेवक यांची उपस्थिती होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR