40 C
Latur
Sunday, April 28, 2024
Homeसोलापूरशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून रुपा भवानी चरणी घातले साकडे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून रुपा भवानी चरणी घातले साकडे

सोलापूर:
कोरोना महामारी मध्ये संपूर्ण राज्याचे कुटुंबप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी अतिशय चांगले आणि प्रामाणिक काम केल्यामुळे राज्यातील सर्व नागरिकांनी त्यांना कुटुंब प्रमुख म्हणून आपल्या काळजात कोरलं असून पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे यांची वर्णी लागावी असे साकडे शिवसेना उपनेत्या अस्मिता गायकवाड यांनी शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये रूपा भवानी मातेच्या चरणी घातले. शिवसेना उपनेत्या अस्मिता गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर शहरांमध्ये शिव संपर्क मोहीम धुमधडाक्यात सुरू झाली असून शिवसैनिक आणि नागरिकांचा या शिवसंपर्क मोहिमे साठी मोठा प्रतिसाद मिळत आहे.

दुसऱ्या दिवशी शिवसंपर्क अभियानास रूपा भवानी मातेची ओटी भरून आणि महाआरती करून करण्यात आला. शिवसेनेच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक घरापर्यंत आणि प्रत्येक घरातील महिलांपर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे विचार आणि मशाल हे चिन्ह पोहोचवण्यासाठी तसेच सत्ताधाऱ्यांनी दिलेली खोटी आश्वासनं जनतेसमोर होऊ दे चर्चा या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न अस्मिता गायकवाड यांनी अभ्यास पूर्ण शैलीतून मांडला. अस्मिता गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या बहुसंख्य महिला रणरागिनींनी “आई राजा उदो उदो ,”बोल भवानी माते की जय, अरे आवाज कुणाचा शिवसेनेचा … उद्धव साहेब ठाकरे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है ,…भेदक घोषणा देऊन सर्व महिलांनी वातावरण शिवसेनामय केले. यावेळी रूपा भवानी मातेच्या चरणी राज्यातील सर्व महिलाना सुख आणि समाधान लाभू दे …शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होऊ दे असं साकडे अस्मिता गायकवाड यांनी रूपा भवानी मातेच्या चरणी घातले.

या शिव संपर्क अभियानामध्ये महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख महानंदा सावंत, दक्षिण सोलापूर तालुका महिला आघाडी अध्यक्षा शशिकला चिवडशेट्टी, वैशाली सातपुते, मंगल थोरात, अन्नपूर्णा कलाल, सरस्वती कोरे, विजयाबाई गवळी, रूपाली मस्के, रूपाली ननवरे, स्वाती रुपनर, रतन सुरवसे, सिंधुबाई डांगे, अनिता चव्हाण, जयश्री पाटील, यशोधरा जाधव, उज्वला बिराजदार, प्रभावती येलगुंडे ,सीमा घळके, जमुनाबाई भिसे, मीना येनपुरे, मनीषा चव्हाण, सुरेखाताई पौळ, मीनाक्षी गवळी, मंगल मोरे, राधिका मीठ्ठा, ज्योती माळवदकर गुरुदेवी गुबेडकर, महादेवी सरवदे, सुरेखा वाडकर ,रमा सरवदे, संतोषी भोळे, सविता पतंगे, अंबिका चौगुले, आदी सह अनेक महिला मोठ्या संख्येने या शिवसंपर्क अभियानामध्ये उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR