17.1 C
Latur
Friday, November 29, 2024
Homeवाराणसीच्या १० मंदिरांमधून हटवली साईबाबांची मूर्ती

वाराणसीच्या १० मंदिरांमधून हटवली साईबाबांची मूर्ती

 

वाराणसी : वृत्तसंस्था
येथील मंदिरांमधून सध्या साईबाबांच्या मूर्ती हटवण्यात येत आहेत. सर्वप्रथम काशीमधील बडा गणेश मंदिर येथून साई बाबांची मूर्ती हटवण्यात आली. त्यानंतर पुरुषोत्तम मंदिरामधून साईबाबांची मूर्ती हटवण्यात आली. येत्या काही दिवसांमध्ये वाराणसीमधील आणखी काही मंदिरांमधून साईबाबांच्या मूर्ती हटवण्यात येतील. सनातन रक्षक दलाकडून ही कारवाई करण्यात येत आहे.

आतापर्यंत सुमारे १० मंदिरांमधून साईबाबांच्या मूर्ती हटवण्यात आल्या आहेत. सनातन रक्षक दलाने याबाबत सांगितले की, आतापर्यंत आम्ही अज्ञानामधून साईबाबांची पूजा करत होतो. आता आम्ही मूर्ती हटवत आहोत. पूर्ण सन्मानासह मंदिर व्यवस्थापनाच्या मान्यतेनंतर साईबाबांच्या मूर्ती हटवण्यात येत आहेत.

साईबाबांच्या मूर्ती हटवण्यामागचे कारण सांगताना सनातन रक्षक दलाने सांगितले की, आम्ही साई बाबांचे विरोधक नाहीत. मात्र शास्त्रानुसार कुठल्याही मंदिरामध्ये मृत माणसाची मूर्ती स्थापन करून तिची पूजा करणे वर्ज्य आहे. हिंदू धर्मानुसार मंदिरांमध्ये केवळ सूर्य, विष्णू, शिव, शक्ती आणि गणपती यांच्या स्वरूपात मूर्ती स्थापन केल्या जाऊ शकतात.

साईबाबांच्या पूजेवरून वाद होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी साई पूजेला विरोध केला होता. बागेश्वर धाम येथील धीरेंद्र शास्त्री यांनीही साई बाबांच्या पूजेला विरोध केला होता. ते म्हणाले होते की, मी साईबाबांचा विरोधक नाही. साईबाबांची महात्मा म्हणून पूजा होऊ शकते. मात्र परमात्मा म्हणून त्यांची पूजा होऊ शकत नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR