विलास  कारखान्याला राष्ट्रीय स्तरावरील मानाचा ‘उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता’ पुरस्कार

लातूर : प्रतिनिधी
तालुक्यातील निवळी (वैशालीनगर) येथील विलास सहकारी साखर  कारखान्याला राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघ लि., नवी दिल्ली यांच्या वतीने गळीत हंगाम २०२५-२६ साठी राष्ट्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता’ जाहीर झाला आहे. या कारखान्याला मिळालेला हा एकूण ४० वा पुरस्कार आहे. या यशामुळे सहकार क्षेत्रात एक नवा ऐतिहासिक विक्रम घडला आहे.
मांजरा परिवाराचा आदर्श घेऊन विलास सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री आणि लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तसेच महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार, संस्थापक चेअरमन अमित विलासराव देशमुख यांनी आधुनिक साखर उद्योगात दिलेल्या योगदानाचे या निमित्ताने देशभर कौतुक होत आहे. हा पुरस्कार मंगळवार, २२ सप्टेंबर रोजी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र, विंडसर पॅलेस, नवी दिल्ली येथे आयोजित पुरस्कार सोहळ्यात सहकार आणि साखर उद्योगातील मान्यवरांच्या हस्ते दिला जाणार आहे. हा पुरस्कार माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख, कारखान्याच्या चेअरमन
श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख, माजी आमदार आणि व्हाईस चेअरमन वैजनाथराव शिंदे, कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील आणि सर्व संचालक मंडळ स्वीकारणार आहेत.
लोकनेते आदरणीय विलासराव देशमुख यांच्या प्रेरणेतून हा कारखाना उभा राहिला आहे. माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या कुशल नियोजनामुळे आणि माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख, लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन धिरज विलासराव देशमुख आणि चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनामुळे हा कारखाना प्रगतिपथावर आहे. मागील हंगामात शेतक-यांना रु. ३,१७१/- प्रती मे. टन असा एफआरपीपेक्षा जास्त उच्चांकी ऊस दर दिला आहे.
राष्ट्रीय स्तरावरील या पुरस्कारासाठी कारखान्याच्या खालील उत्कृष्ट कामगिरीची पडताळणी करण्यात आली आहे. सहकार आणि साखर उद्योगातील साखर कारखान्याच्या हंगाम २०२५-२६ मधील कामकाजाचे मूल्यमापन करून विलास कारखान्याची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. मागील हंगामा तुलनेत साखर उता-यात ०.५ टक्के वाढ नोंदवून १२.२१ टक्के उतारा मिळवला आहे तसेच विना स्टॉपेजेस ऊस गाळप, गाळप क्षमतेचा क्षमतेचा कार्यक्षमपणे वापर, उच्चांकी साखर साखर उतारा,  उच्च प्रतीचे साखर उत्पादन, इंधन वापर कमी आणि उपपदार्थ प्रक्रिया प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालवले, हंगामात कारखाना एकही दिवस बंद राहणार नाही याची काटेकोर काळजी घेतली आहे. शेतक-यांना उच्चांकी दर आणि एफआरपीपेक्षा जास्त ऊस दर दिला आहे इत्यादी कारखाना कामकाजाची दखल घेऊन सदरील पुरस्कारासाठी विलास साखर कारखान्याची निवड करण्यात आली आहे.
कारखान्याने गेल्या गळीत हंगामात चांगले तांत्रिक नियोजन करून ६,५१,४३१.२३६ मे. टन उसाचे यशस्वी गाळप केले. यात १२.२१ टक्के सरासरी उच्च साखर उतारा मिळाला आहे आणि ७,१४,४७० क्विंटल साखर तयार झाली. याशिवाय कारखान्याने ४ कोटी ७८ लाख ८० हजार ६०० युनिट वीज तयार केली. त्यातील २ कोटी ८२ लाख युनिट वीज निर्यात केली आहे. डिस्टिलरी प्रकल्पातून १ कोटी १ लाख लिटर इथेनॉल तयार झाले आहे. आगामी गळीत हंगामासाठी कारखान्याने ऊस तोडणीचे योग्य नियोजन केले आहे. भविष्यातील उसाची उपलब्धता लक्षात घेता, जास्तीत जास्त ऊस तोडणी हार्वेस्टर हणजे ऊस तोडणी यंत्राद्वारे केली जाईल. १०० टक्के यांत्रिकीकरण झाल्यावरही गाळप वेगाने आणि कार्यक्षमतेने व्हावे, यासाठी कारखान्यात आवश्यक ती आधुनिक मशिनरी बसवली जात आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Sanjay Raut On Manoj jarange|जरांगेंच्या उपोषणावर राऊत संतापले; सरकारला सुनावलं!
12:37
Video thumbnail
Dharashiv|उमरगा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा! शेतकऱ्यांचा सरकारला इशारा
02:40
Video thumbnail
Latur|लातूर ते कोकण थेट रेल्वे कनेक्टिव्हिटी! गणेशोत्सवात प्रवाशांची मोठी सोय
03:46
Video thumbnail
BIG BREAKING! राज्यातील १८० तालुके दुष्काळसदृश घोषित | बाबासाहेब पाटलांची मोठी घोषणा
04:00
Video thumbnail
Purna|पूर्णा तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यासाठी शेतकरी आक्रमक!
01:08
Video thumbnail
Latur|जळकोट तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा! काँग्रेसचा एल्गार; २४ सप्टेंबरला बैलगाडीसह मोर्चा
00:54
Video thumbnail
Latur|जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा; निटूरमध्ये टायर पेटले, महामार्ग ठप्प!
01:17
Video thumbnail
Latur Maratha Protest|मागण्या मान्य करा,नाहीतर मुंबई गाठू! लातूरमध्ये मराठा आंदोलकांचा सरकारला इशारा
01:19
Video thumbnail
Latur|पाऊस गायब, पिकं वाळली अन् बैलपोळाही फिका! लातूरच्या शेतकऱ्यांची काळीज पिळवटून टाकणारी व्यथा
04:49
Video thumbnail
Nanded Accident|नांदेड-भोकर मार्गावर भीषण अपघात! 6 ठार, 8 गंभीर जखमी
00:46
Video thumbnail
Nanded|बैल पोळ्यातही मराठा आरक्षणाची धग! बैलांच्या पाठीवर लिहिले आरक्षणाचे नारे
00:43
Video thumbnail
Latur|स्कॉर्पियो पेटवली अन् आरोपी फरार! कव्हा नाका परिसरात खळबळ
00:42
Video thumbnail
Latur|मराठा आरक्षणासाठी मसलगा येथे मराठा समाजबांधव आक्रमक
01:31
Video thumbnail
Dharashiv|डीजेच्या तालावर बैलांची मिरवणूक; माडजमध्ये बैलपोळ्याचा उत्साह
01:06
Video thumbnail
Nanded|मराठा आरक्षणासाठी टाकीवर आंदोलन; हदगाव तालुक्यात नेमकं काय घडलं?
00:31

Latest news