25 C
Latur
Friday, October 4, 2024
Homeपरभणीविविध क्षेत्रातील मान्यवर सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित

विविध क्षेत्रातील मान्यवर सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित

परभणी : डॉ.जाकीर हुसेन बहुउद्देशीय सेवाभावी संस्था चारठाणा आयोजित सेवा गौरव पुरस्कार वितरण सोहळा दि.२१ सप्टेंबर रोजी पार पडला. या सोहळ्यात विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणा-या मान्यवरांचा सेवा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

अध्यक्षस्थानी माजी आ. विजयराव भांबळे होते. शुभ हस्ते सत्तार इनामदार (प्रदेश महासचिव अल्पसंख्याक काँग्रेस), महाराष्ट्र भूषण आर.डी.मगर, पं.स.सभापती मधुकर भवरे, खदीर लाला हाश्मी, माजी सरपंच शंकर जाधव, तंब्बु पटेल, सरदार खान (लाला भाई), आयोजक शेख शफीख चारठाणकर उपस्थित होते. या कार्यक्रमात महाजन शिवशंकर आप्पा (चारठाणा), सुनीता अहिरे (परभणी), सपोनि. बालाजी गायकवाड (नांदेड), शेख सरफराज (परभणी), नवाजररहेमान कुरेशी (जिंतूर), श्रीमती शांताताई उखळकर (परभणी), तसलीमा पठाण (परभणी), बबन अण्णा मुळे (परभणी), अलीहुसेन आदमानकर (परभणी) यांना मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

यशस्वीतेसाठी माजी पं.स. सदस्य सलीम काझी, मा. उपसरपंच जलील इनामदार, चारठाणा सोसायटीचे अध्यक्ष किरण देशमुख, शेख ईकरामोद्दीन, शेख तोफीख, शेख जावेद, शेख रईस, शेख जब्बार, खैसर काझी आदींनी परिश्रम घेतले. यावेळी माजी आ.भांबळे, प्रदेश महासचिव अल्पसंख्याक काँग्रेस सत्तार इनामदार, इंजि.मगर, पं.स.सभापती मधुकर भवाळे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन आत्माराम म्हेत्रे तर आभार प्रदर्शन डॉ. जाकीर हुसेन बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शेख शफीख चारठाणकर यांनी मानले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR