22.9 C
Latur
Sunday, March 3, 2024
Homeमहाराष्ट्रसोने समजून चक्क अस्थीची गोणी पळवली

सोने समजून चक्क अस्थीची गोणी पळवली

गावक-यांनी पाठलाग करुन पकडले अन् चोरट्यांचा पोपट झाला

छत्रपती संभाजीनगर : सावडण्याच्या कार्यक्रमानंतर गोणीत भरून ठेवलेली अस्थी आणि राखेला सोनं असल्याच्या अंदाजावरून चोरट्यांनी गोणी दुचाकीवर टाकून पसार झाले. ही बाब लक्षात येताच ग्रामस्थांनी दुचाकी स्वार चोरट्यांचा पाठलाग केला. ग्रामस्थ पाठलाग करत असल्याचे लक्षात येताच चोरट्यांनी गाडी पळवली. दरम्यान, अंतरवली खांडी रोडवर राखेसह चोरट्यांना ग्रामस्थांनी ताब्यात घेतले. चोरट्यांना जाब विचारत दोघांनाही पोलिसांच्या ताब्यात दिले. पैठण तालुक्यातील कडेठाण बुद्रुक गावात ही विचित्र घटना घडली.

ज्ञानेश्वर सूर्यभान तळपे रा. कडेठाण, बाळू मिसाळ रा. कडेठाण, मंदा पांडुरंग गायकवाड रा. इंदिरानगर पैठण असे राख चोरणा-या चोरट्यांची नाव आहे.
दरम्यान, या प्रकरणी स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, कडेठाण बुद्रुक येथील सीमाताई पवार यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. दरम्यान, अंत्यसंस्कारानंतर राख सावडण्याचा कार्यक्रम होता. सावडल्यानंतर राख गोणीत भरण्यात आली. त्यानंतर कुटुंबीय आणि नातेवाईक घरी गेले.

गोणीत भरलेली राख पैठणला घेऊन जाण्यासाठी घरातील काही सदस्य दुचाकी आणण्यासाठी गावात गेले होते. हीच संधी साधून राख भरून ठेवलेल्या गोणीत सोनं असावं असा अंदाज लावून दुचाकीस्वार चोरट्यांनी गोणी घेऊन पोबारा केला. ही बाब ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ दुचाकी चोरट्यांचा पाठलाग सुरू केला.

दरम्यान, अंतरवाली खांडी रोडवर त्यांना गाठून ताब्यात घेतले. दरम्यान, त्यांच्याकडून राख ताब्यात घेण्यात आली. या राखेमध्ये सोने असल्याच्या संशयावरून त्यांनी चोरली असावी असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. दरम्यान, या प्रकरणी पाचोड पोलस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR