29.1 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रमराठी पाट्यांसाठी संभाजीनगर महापालिकेचा दुकानदारांना १५ दिवसांचा अल्टिमेटम

मराठी पाट्यांसाठी संभाजीनगर महापालिकेचा दुकानदारांना १५ दिवसांचा अल्टिमेटम

अन्यथा दुकाने सील करणार

छत्रपती संभाजीनगर : शहरातील सर्व दुकानांची व कार्यालयांची नाव फलक किंवा साइनबोर्ड मराठी भाषेत लावावेत, यासाठी महापालिकेने १५ दिवसांची मुदत दिली आहे. तसे आदेश छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांनी दिले. मनपा प्रशासकांनी रविवारी शहरातील काही भागात पाहणी करत दुकानाचे, प्रतिष्ठानचे नाव राज्य शासनाच्या आदेशानुसार मराठी भाषेत लिहिण्याचे निर्देश दिले. याशिवाय मोठ्या अक्षरात नावे लिहावे, असेही सांगितले. तसेच, मराठी भाषेत साइनबोर्ड लावण्यासाठी त्यांनी १५ दिवसांची मुदत दिली. ही मुदत संपल्यावर सुद्धा दुकानदारांनी दुकानांचे साइनबोर्ड मराठीत नाही लावले, तर दुकाने आणि प्रतिष्ठानांना सील करण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय.

शहरातील प्रोझोन मॉलसह शहरातील सर्व दुकाने व प्रतिष्ठान यांनी दुकानाचे नावफलक किंवा साइनबोर्ड मराठी भाषेत पण लावावे, असे आदेश आज छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी दिले आहेत. मनपा प्रशासकांनी रविवारी प्रोझोन मॉलला भेट दिली. मॉलमधील सर्व शोरूम मालकांना त्यांच्या दुकानाचे, प्रतिष्ठानचे नाव राज्य शासनाचा आदेशानुसार मराठी भाषेत लिहण्याचे निर्देश दिले. याशिवाय ज्या शोरूम्सचे नाव मराठी भाषेत बारीक अक्षरात लिहले आहे त्यांनी मोठ्या अक्षरात नावे लिहावे, असे निर्देश यावेळी प्रशासकांनी दिले. तसेच मराठी भाषेत साइनबोर्ड लावण्यासाठी त्यांनी दिवसाची मुदत दिली. ही मुदत संपल्यावर पण प्रोझोन मॉल आणि शहरातील इतर सर्व दुकानदारांनी त्यांच्या दुकानांचे साइनबोर्ड मराठी भाषेत नाही लावले तर अशा दुकानी आणि प्रतिष्ठानांना सील करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

मनसेकडून आंदोलन
महाराष्ट्रातील प्रत्येक दुकानावर असेललं नाव मराठीतच असले पाहिजे अशी भूमिका मनसेकडून सतत करण्यात येत आहे. यासाठी अनेकदा मनसेकडून आंदोलन देखील करण्यात येते. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देखील मनसे याच मुद्यावरून आक्रमक झाल्याचे काही दिवसांपूर्वी पाहायला मिळाले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनसे स्टाईल आंदोलन करण्यात आले होते. यावेळी मनसेच्या पदाधिका-यांनी शहरातील हडको कॉर्नर येथील इंग्रजी भाषेत लावलेल्या पाट्यांची तोडफोड केली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR