जयपूर : देशात सुमारे ५ टक्के लोक हृदयाच्या अनियमित ठोक्यांचा गंभीर आजार ‘अरिद्मिया’ने ग्रस्त आहेत. विविध वैद्यकीय अहवालांनुसार, यातील ११ टक्के पुरुष व ९ टक्के महिलांचा मृत्यू या आजारामुळे होतो. त्यावर जयपूरमध्ये इनसाइट एक्स या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने उत्तम उपचार करणे शक्य होणार आहे. ते हृदयाच्या ठोक्यांशी संबंधित गुंतागुंतीच्या आजारांचे केवळ अचूक निदानच करत नाही, तर कोणत्याही रेडिएशनशिवाय कमी वेळेत व उपचारदेखील करते.
जयपूरच्या इटर्नल हॉस्पिटलमध्ये राजस्थानची पहिली अत्याधुनिक इलेक्ट्रोफिजिओलॉजी लॅब सुरू झाली असून तिथे हे तंत्रज्ञान उपलब्ध आहे.
इटर्नल हॉस्पिटलच्या कार्डिओलॉजी विभागाचे चेअरमन डॉ. जितेंद्र सिंग मक्कड यांनी सांगितले की, हृदयात जिथून अनियमित ठोके निर्माण होतात ते स्थान इनसाइट एक्स तंत्रज्ञानामुळे अचूकरीत्या समजते. हे तंत्रज्ञान विशेषत: एट्रियल फिब्रिलेशन, वेंट्रिक्युलर टॅकिकार्डिया आणि एट्रियल फ्लटर यासारख्या आजारांमध्ये खूप प्रभावी ठरत आहे.
इटर्नल हॉस्पिटलचे डायरेक्टर (इलेक्ट्रोफिजिओलॉजी व हार्ट फेल्युअर ) डॉ. कुश कुमार भगत यांनी सांगितले, इनसाइट एक्स तंत्रज्ञानामुळे कोणत्याही रेडिएशन शिवाय ३डी मॅपिंग करू शकतो. विशेषत: गर्भवतींसाठी हे तंत्रज्ञान वरदान ठरत आहे. भारतात २ टक्के गरोदर स्त्रियांमध्ये अरिद्मियाची समस्या दिसून येते. आता आम्ही त्यांच्यावर कोणत्याही जोखमीशिवाय यशस्वी उपचार करू शकतो.