२० दिवसांनी जरांगेंचे उपोषण अखेर मागे

बीडमध्ये पहाटेपर्यंत मंत्री, नेत्यांशी चर्चा, शिष्टाई यशस्वी
बीड : प्रतिनिधी
मनोज जरांगे पाटील यांनी अखेर २० दिवसाच्या आमरण उपोषणाला पूर्ण विराम दिला. सरकारच्या प्रतिनिधींशी झालेल्या चर्चेनंतर जरांगे यांनी गुरुवारी पहाटे उपोषण सोडले. जरांगे यांनी उपोषण सोडावे, यासाठी काल दिवसभर आणि रात्रभर खलबते सुरू होती. अखेर त्याला यश आले. यासाठी थेट पॅरिसमधून हालचाली झाल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडावे म्हणून मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, आमदार प्रसाद लाड, दादा भुसे आणि आमदार सुरेश धस हे प्रयत्न करत होते. हे नेते जरांगेंना भेटण्यासाठी पहाटेच बीडला गेले होते. यावेळी जरांगेंशी चर्चा करून त्यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या. तसेच काही मागण्यांसाठी जरांगेंकडून वेळ मागून घेण्यात आला. जरांगे यांनीही त्याला सहमती दर्शवली आणि जरांगेंच्या उपोषणाची सांगता झाली.

ऐन गणेशोत्सवात मुंबईत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून जरांगे यांनीही एक पाऊल मागे घेतल्याने सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला. जरांगे यांच्या या निर्णयाचे स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही स्वागत केले. जरांगे यांच्याशी बीडच्या पाटोद्यात सरकारचे चार नेते चर्चा करत होते. पण त्याचवेळी दुसरीकडे पॅरिसमधूनही सूत्रे हलत होती. पॅरिसमधून साडेतीन तास मनोज जरांगेंच्या सहका-यांशी चर्चा करण्यात आली. त्यानंतर जरांगे यांनी आंदोलनाला अर्धविराम देण्याचा निर्णय घेतला.

जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उदय सामंत यांनी काल दिवसभरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी किमान ७ वेळा चर्चा केली. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशीही सामंत यांनी सातवेळा चर्चा केली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वरिष्ठ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार प्रसाद लाड आणि उदय सामंत यांच्यात कॉन्फरन्स कॉलवर चर्चा झाली. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्या सहका-यांशी उदय सामंत यांची चर्चा केली आणि त्यांच्या शिष्टाईला अखेर यश आले.

मंत्री उदय सामंत यांनी
पॅरिसमधून सूत्रे हलविली
राज्याचे उद्योगममंत्री उदय सामंत हे पॅरिसमध्ये आहेत. ते पॅरिसमधून जरांगे यांच्या सहका-यांच्या संपर्कात होते. जरांगे आणि सामंत यांची मैत्री सर्वश्रूत आहे. त्यामुळेच सामंत यांनी पॅरिसमधून सूत्रे हलवली. सामंत यांनी पॅरिसमधून जरांगे यांच्या सहका-यांशी साडेतीन तास चर्चा केली. त्यानंतर जरांगे यांनी माघार घेतली, असे सांगण्यात आले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|आदर्श संस्थेमधील घटनेवर भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष आमदार चित्रा वाघ यांनी तीव्र प्रतिक्रिया
01:54
Video thumbnail
Nanded|लग्नाला नकार दिला अन् भररस्त्यात चाकू हल्ला! नांदेडमध्ये खळबळ
00:55
Video thumbnail
Latur|नाईस चायनीज सेंटरमध्ये तोडफोड; आरोपीला सोडल्याचा पोलिसांवर आरोप
03:21
Video thumbnail
Latur|SIR विरोधात महाविकास आघाडी आक्रमक; निलंग्यात ८ ऑक्टोबरला महामोर्चाची घोषणा
05:13
Video thumbnail
Latur|अल्पवयीन मुलींच्या शोषणाच्या आरोपाने लातूर हादरलं; नागरिकांचा मोर्चा
17:27
Video thumbnail
Latur|मध्यरात्री इलेक्ट्रॉनिक दुकान पेटलं; कोट्यवधींचं नुकसान!
03:11
Video thumbnail
Latur|विद्यार्थिनीची लैंगिक छळ प्रकरण!लातूरकर संतापले;आदर्श कॅम्पसवर दगडफेक
03:06
Video thumbnail
mpsc विद्यार्थ्यांच्या आंदोलनातून आमदार रोहित पवार लाईव्ह
24:43
Video thumbnail
Latur|लातूरच्या गांधी मार्केट येथील इलेक्ट्रिक वास्तूच्या दुकानाला भीषण आग#Latur #fire
00:30
Video thumbnail
Latur|लातूर शहरात खुलेआम दादागिरी; चायनीज सेंटरमध्ये दुचाकी घुसवून नासधूस
00:39
Video thumbnail
Latur|लातूरच्या शैक्षणिक क्षेत्रात खळबळ! विद्यार्थिनीचा विनयभंग;संस्थाचालकाविरोधात गुन्हा दाखल
01:15
Video thumbnail
Latur|एकर सोयाबीन पावसाअभावी उद्ध्वस्त; केळगावच्या शेतकऱ्यांचा हृदय पिळवटून टाकणारा निर्णय
03:28
Video thumbnail
Latur|लातूर पोलिसांची दमदार कामगिरी; हरवलेले ५१ मोबाईल मूळ मालकांना परत
03:43
Video thumbnail
Latur|वडवळ नागनाथ गावात भीषण पाणीटंचाई; पाण्यासाठी ग्रामस्थांची वणवण
03:21
Video thumbnail
Nanded|नांदेड पोलिसांची मोठी कामगिरी; चोरीला गेलेले ३०५ मोबाईल मूळ मालकांना परत
02:20

Latest news