Homeमहाराष्ट्रअन्नविषबाधेमुळेच मुंबईतील ‘त्या’ चौघांचा मृत्यू

अन्नविषबाधेमुळेच मुंबईतील ‘त्या’ चौघांचा मृत्यू

पोस्टमॉर्टेम रिपोर्टमधून समोर आले खरे कारण

मुंबई : येथील पायधुनी परिसरात राहणा-या कुटुंबातील चार जणांचा बिर्याणी खाल्ल्यानंतर कलिंगडाचे सेवन केल्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेच्या कारणांबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. दरम्यान, पोस्टमॉर्टेमच्या प्राथमिक अहवालातून या चौघांच्याही मृत्यूमागच्या प्राथमिक कारणाबाबत महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. ‘किडनी फेल होणे’ हे या चौघांच्याही मृत्यूमागचे कारण असू शकते असे संकेत पोस्टमॉर्टेममधून मिळाले आहेत.

मुंबईतील पायधुनी परिसरात राहणा-या दोकाडिया कुटुंबातील अब्दुल्ला दोकाडिया, त्यांची पत्नी नसरीन, मुलगी आयशा आणि दुसरी मुलगी जैनब दोकाडिया यांचा बिर्याणी आणि कलिंगड खाल्ल्याने झालेल्या या दुर्घटनेत मृत्यू झाला.

या चौघांनीही रात्री भोजनात बिर्याणी खाल्ली होती. तसेच रात्री उशिरा कलिंगड खाल्ले होते, अशी माहिती पोलिसांना दिली. दरम्यान, अन्न विषबाधेमुळे या चौघांच्याही किडन्यांची मोठ्या प्रमाणात हानी झाली होती, असे पोस्टमॉर्टेमच्या रिपोर्टमधून समोर आले आहे. आता या चौघांनाही ही अन्न विषबाधा नेमकी कोणत्या कारणामुळे झाली, याचा तपास पोलिस करत आहेत. या चौघांच्याही मृतदेहाच्या व्हिसेरा तपासणीसाठी नमुने पाठवण्यात आले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR