22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रअपात्रता सुनावणी संपली, आता निकालाची प्रतीक्षा

अपात्रता सुनावणी संपली, आता निकालाची प्रतीक्षा

मुंबई : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणी सदस्यांची निवड पक्षाच्या घटनेनुसार झालेली नाही. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांची नेमणूकही निवडणूक न घेता झाली आहे. पक्षाच्या घटनेनुसार शरद पवार हे पक्षाचे सदस्य नसल्याने अध्यक्ष कसे होऊ शकतात, असा युक्तिवाद अजित पवार गटाच्या वकिलांकडून आज करण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रतेची सुनावणी पूर्ण झाली असून येत्या १५ फेब्रुवारीपर्यंत याचा निकाल येण्याची शक्यता आहे. गेले आठवडाभर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी विधिमंडळात पार पडली आहे. या सुनावणीत जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड या शरद पवार गटातील सदस्यांची तर अजित पवार गटाच्या सुनील तटकरे, अनिल भाईदास पाटील यांची उलटतपासणी झाली. त्यानंतर सलग दोन दिवस दोन्ही गटांच्या वकिलांकडून युक्तिवाद करण्यात आला. राष्ट्रवादीतील पदाधिका-यांच्या निवडी आणि राष्ट्रीय अध्यक्ष निवडीसाठी निवडणुकाच झालेल्या नाहीत, असेही यावेळी सांगण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR