24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeसंपादकीय विशेषअमेरिकन निवडणुकीतील ‘भारतीय’

अमेरिकन निवडणुकीतील ‘भारतीय’

जगभरातील विविध देशांमध्ये भारतीय वंशाच्या नागरिकांनी तेथील सत्ताकारणामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. जागतिक महासत्ता असणा-या अमेरिकेत एके काळी भारतीय अमेरिकी नागरिक तेथील राजकीय पक्षांना मोठी देणगी देण्यातच समाधान मानायचे पण या मानसिकतेत अलीकडच्या काळात बदल झाला आहे. खरी ताकद कशात आहे, याचा विचार ते करू लागले आहेत म्हणूनच ते उमेदवार म्हणून समोर येण्याचा प्रयत्न करित आहेत. पुढील वर्षी होणा-या निवडणुकांमध्येही भारतीय वंशाच्या तीन प्रमुख उमेदवारांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. त्याविषयी…

अमेरिकेत पुढील वर्षी होणा-या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत भारतीय वंशांच्या उमेदवारांची कामगिरी कशी राहिल, यावरून सध्या चर्चा सुरू आहे. एक वर्षापूर्वी हेच उमेदवार रिपब्लिकन नेते आणि माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा बरेच मागे होते. मात्र आता त्यांचा बोलबाला राहत आहे. तरीही ट्रम्प यांनी अन्य दावेदार उमेदवाारांना मागे टाकत निर्णायक आघाडी घेतली असून ही बाब अध्यक्षपदाच्या निवडणुकत आणखी स्पर्धक निर्माण करणारी आणि रोमांच निर्माण करणारी राहू शकते.

अध्यक्षपदाच्या निवडणूक रिंगणात अन्य कोणत्याही स्पर्धक व्यक्तीने आपण उमेदवारी अर्ज मिळवण्यास पात्र राहू, असा ठोस दावा केला नाही. कारण त्यांच्यात आणि ट्रम्प यांच्यात बरेच अंतर आहे. शेवटी ट्रम्प आणि अध्यक्ष ज्यो बायडेन यांनाच अधिकृत उमेदवार म्हणून निवडले जाण्याची शक्यता आहे. अशी स्थिती असतानाही आणि स्पर्धेत टिकून राहण्याची शक्यता धुसरच असताना तीन भारतीय वंशाच्या नागरिकांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उडी का मारली? असा प्रश्न निर्माण होतो. सर्वात अगोदर म्हणजे त्यांच्या महत्त्वकांक्षेने भरारी घेतली. मग आपण जिंकू किंवा पराभूत होवोत, याची तमा न बाळगता या स्पर्धेत त्यांनी आपला सहभाग नोंदविला आहे. अर्थात त्यांना राष्ट्रीय पातळीवर चांगल्या रितीने ओळखले जाते. दुसरी बाब म्हणजे ही मंडळी डोनाल्ड ट्रम्प यांच्या खूप मागे आहेत. त्याचवेळी निकी हॅले आणि रामास्वामी हे भारतीय वंशांच्या वाढत्या राजकीय वर्चस्वाचे प्रतिनिधीत्व करत आहेत. तिसरे म्हणजे अनिवासी भारतीय हा अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलियासारख्या देशांत एक सक्षम आणि प्रभावशाली समुदाय म्हणून उदयास आला आहे.

हा समुदाय संसदेत आणि समाजात एक शक्तीशाली लॉबी म्हणून नावारुपास आला आहे. चौथी गोष्ट म्हणजे एकेकाळी भारतीय अमेरिकी नागरिक अमेरिकेतील राजकीय पक्षांना मोठी देणगी देण्यातच समाधान मानायचे. पण या मानसिकतेत अलिकडच्या काळात बदल झाला आहे. खरी ताकद कशात आहे, याचा विचार ते करू लागले आहेत. म्हणूनच ते उमेदवार म्हणून समोर येण्याचा प्रयत्न करत आहेत. पाचवी गोष्ट म्हणजे कमला हॅरिस आण निकी हॅले यांनी स्वत:च राजकीय वर्तुळात निर्माण केलेले स्थान. विवेक रामास्वामी हे आताच जगासमोर आले आहेत. या तिन्ही व्यक्ती अनिवासी भारतीयांची अपत्य आहेत आणि त्यांचे पालनपोषण अमेरिकेत झाले आहे. अनिवासी भारतीयांचा एक गट अमेरिक राजकारणाला पाठिंबा, अर्थसा , संबंध ठेवण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतो. अध्यक्षपदाच्या अभियानावेळी निकी हॅले यांनी आपल्या भाषणात अनिवासी भारतीय असल्याचा विशेषत्त्वाने उल्लेख केला. त्या म्हणाल्या, ‘‘ मी अनिवासी भारतीयांना अभिमान वाटावा अशी कन्या आहे. मी ना कृष्णवर्णिय ना श्वेतवर्णिय. मी वेगळी आहे.’’

कमला हॅरिस या अमेरिकेच्या पहिल्या महिला उपाध्यक्ष आहेत. कमला हॅरिस यांची आई श्यामला या तमिळनाडूतून अमेरिकेत स्थलांतरित झाल्या होत्या. निकी हॅले यांची ओळख अनेक कामगिरीतून निर्माण झाली आहे. अमेरिकेच्या इतिहासात गर्व्हनर म्हणून सेवा करणा-या त्या पहिल्या अशियायी अमेरिकी महिला ठरल्या. अमेरिकी अध्यक्षांच्या मंत्रिमंडळात पहिली अनिवासी भारतीय सदस्य आणि जीओपी. युक्रेन संघर्ष आणि इस्राईल व हमास यांच्यात युद्ध सुरू असताना हॅले यांच्याकडे प्रभावी परराष्ट्र धोरण आहे. कमला हॅरिस आणि रामास्वामी या दक्षिण भारतीय आहेत आणि हॅले यांच्याकडे पंजाबी वारसा आहे. अमेरिकेतील पहिले प्रमुख अनिवासी भारतीय आणि अध्यक्षपदाचे उमेदवार लुईसियानाचे माजी गर्व्हनर बॉबी जिंदल यांचे आई वडिल १९७१ मध्ये अमेरिकेत स्थलांतरित झाले होते. हेली आणि बॉबी जिंदल हे अमेरिकेचे गर्व्हनर झाले आणि त्यामुळे एक वेगळा प्रभाव अमेरिकेच्या राजकारणावर पडला. त्याचेवळी जिंदल हे राजकीय पटलावरून अचानक गायब झाले आणि निकी हॅले मात्र अजूनही चर्चेत आहेत. निर्वासित धोरण संस्थांच्या मते, १९६० मध्ये अमेरिकेत केवळ १२ हजार अनिवासी भारतीय राहत होते. अर्थात आजच्या जनगणनेतील आकडेवारीतून ही संख्या लक्षणीयरित्या वाढली असून ती आता ४० लाखांवर पोचली आहे.

भारतीय वंशाचे अमेरिकी नागरिकांची लोकसंख्या ही एकूण लोकसंख्येच्या १.३ टक्के आहे. तसेच दोन्ही प्रमुख राजकीय पक्षाचे प्रमुख सदस्यही आहेत. अर्थात रिपब्लिकन पक्ष हा अमेरिकेत अनिवासी भारतीयांना विजय मिळवून देण्यात समर्थ राहू शकत नाही. मात्र काटे की टक्कर असलेल्या राज्यांत किरकोळ रुपात का होईना मिळणारी आघाडी ही महत्त्वाची राहू शकते. कमला हॅरिस या यशस्वी होण्याची अटकळ बांधली जात असताना त्या बायडेन यांच्या साथीदार म्हणून वावरत आहेत. हॅले अणि रामास्वामी यांना अनुक्रमे ६ आणि पाच टक्के जनतेचा पाठिंबा मिळाला आहे. त्याचवेळी राजकीय पक्षाने अद्याप आपल्या उमेदवारांची अधिकृतपणे घोषणा केलेली नाही. २०२० मध्ये अनिवासी भारतीयांनी अध्यक्ष ज्यो बायडेन यांना ७४ टक्के मते दिली तर त्याचवेळी पंधरा टक्के मते ही ट्रम्प यांच्या वाट्याला आली. संघ परिवाराशी संबंधित एक संघटना १९६० च्या दशकांपासून अमेरिकेत अस्तित्वात आहे. अटलबिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदी यांनी अनिवासी भारतीयांना सुविधा देण्यासह संघटित होण्यास मदत केली आहे.

– कल्याणी शंकर,
ज्येष्ठ पत्रकार-विश्लेषक

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR