मुंबई : प्रतिनिधी
रामायणाची मालिका तयार करणारे दिग्दर्शक रामानंद सागर यांचे पुत्र आनंद रामानंद सागर चोप्रा यांचे आज निधन झाले. मुंबईत त्यांनी ८४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. या बातमीने बॉलिवूड आणि टेलिव्हिजन जगतात शोककळा पसरली. आनंद सागर यांनी वडिलांचा वारसा पुढे चालवण्याचे काम केले होते. आनंद सागर यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर दुपारी ४.३० वाजता मुंबईतील परमहंस स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. पाच भावंडांमध्ये केवळ आनंद सागर यांनी आपल्या वडिलांचा वारसा पुढे चालवला.
आनंद सागर यांनी रामानंद सागर यांच्यासोबत रामायण या मालिकेच्या निर्मितीमध्ये योगदान दिले होते. १९८७ मध्ये रामायण मालिका तयार होत असताना ते सहनिर्माते होते. त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचा वारसा त्यांनी पुढे सांभाळला. आनंद सागर यांनी पौराणिक आणि भक्तीपर प्रकल्पांची निर्मिती केलेली आहे.

