लातूर : प्रतिनिधी
नीट पेपरफुटी प्रकरणी अटकेत असलेल्या प्रा. शिवराज मोटेगावकर यांचे ‘आरसीसी’ क्लासेस बंद करण्याच्या मागणीसाठी लातुरातील विविध पक्ष संघटनानी दि. ६ जून रोजी ट्युशन एरियातून मोर्चा काढून ‘आरसीसी’ क्लासेस समोर मोटेगावकर, कुलकर्णी आणि डॉ. शिरूरे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.
तसेच प्रा. प्रल्हाद कुलकर्णी, प्रा. शिवराज मोटेगावकर व डॉ. शिरूरे यांना कडक शिक्षा मिळावी अशी मागणीदेखील यावेळी करण्यात आली असून येत्या २१ तारखेपर्यंत ‘आरसीसी’ क्लासेसला कांही करणार नाही मात्र २१ तारखेनंतर ‘आरसीसी’ क्लासेस फोडून टाकू, असा ईशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिलाय.यावेळी ‘आरसीसी’ क्लासेस समोर मोठया प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
















