इंग्लिश स्कूलला टीईटी उत्तीर्ण शिक्षक अनिवार्य

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यातील इंग्लीश स्कूलमध्ये १० व १२ उत्तीर्ण उमेदवार शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना शिकवतात. पालक पाल्यांच्या शिक्षणावर लाखो रूपये खर्च करून करतात. मात्र त्या पाल्यांना दर्जेदार शिक्षण मिळत नाही. यापुढे इंग्लीश स्कूलमध्ये राष्ट्रीय शैक्षणीक धोरणानुसार टीईटी उत्तीर्ण उमेदवार शिकवणीला हवेत. त्या संदर्भाने जिल्हयातील इंग्लीश स्कूलची शिक्षणाधिकारी यांच्या मार्फत तपासणी होऊन १५ दिवसात अहवाल सादर करण्याच्या सुचना अध्यक्षांनी शिक्षणाधिकारी यांना दिल्या आहेत.
लातूर जिल्हा परिषदेची स्थायी समिती सभा सोमवारी दुपारी डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर स्थायी सभागृहात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उषाताई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.  या सभेस उपाध्यक्ष दयानंद सुरवसे, बांधकाम व आरोग्य सभापती ज्ञानेश्वर बिराजदार, कृषी व पशुसंवर्धन सभपती कविता गोरे, महिला व बालकल्याण सभपती शिवकन्या गोडभरले, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी अस्लम तडवी, उपमुख्यकार्यकारी अधिकारी शाम वाखर्डे, समितीचे सदस्य, विविधि विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते. स्थायी समितीच्या सभेत मागील दि. ९ जून रोजी झालेल्या जि.प. स्थायी समिती सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे, मासिक जमा खर्चास मान्यता देवून शासकीय परिपत्रकांचे वाचन, तसेच महिनाभरातील सर्व विभागाचा आढावा या बैठकीत घेतला.
स्थायी समितीच्या सभेत ७ तासांचा ट्रेलर
लातूर जिल्हा परिषदेत सोमवारी स्थायी समितीची सभा पार पडली. या सभेचे कामकाज दुपारी २.३० वाजता सुरू होऊन रात्री ९.३० वाजेपर्यंत म्हणजेच तब्बल ७ तास कामकाज चालले. त्यामुळे मंगळवारी होणा-या सर्वसाधारण सभेत स्थायी समिती पेक्षा अधिक विषय असल्याने जिल्हा परिषद प्रशासनाची मात्र परीक्षाच होणार की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे.
पहिल्या बैठकीतील विषय अद्याप मार्गी लागले नाहीत
लातूर जिल्हा परिषदेत बैठका पार पडत आहेत. मात्र पहिल्या स्थायी समितीत चर्चा झालेल्या विषय अद्याप मार्गी लागला नाही. त्यामुळे तीन-तीन बैठका होऊनही विषय मार्गी लागत नाहीत. अधिकारी विषय गांभीर्याने घेत नाहीत, अशी नाराजी काँगेस पक्षाच्या गटनेत्या आशाताई भिसे यांनी व्यक्त केली.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

द्वारकादास शामकुमारतर्फे १८०० वारक-यांची विनामूल्य पंढरपूर वारी 

लातूर : प्रतिनिधी आषाढी एकादशीनिमित्त गेली १५ वर्षांपासुन द्वारकादास शामकुमार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
LIVE-लातुरात आज आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात एल्गार!
01:23:37
Video thumbnail
Latur|नांदेडमध्ये धाडसी आजीची कमाल; हातात साप घेऊन पोहोचल्या डॉक्टरांकडे
01:48
Video thumbnail
Latur|'उपवर्गीकरण होऊ देणार नाही!' लातुरात निळ्या वादळाचा सरकारला थेट इशारा
02:47
Video thumbnail
LIVE-लातुरात आज आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात एल्गार!
00:00
Video thumbnail
Latur|उपवर्गीकरणाविरोधात ५८ जाती एकवटल्या; लातूरमध्ये ऐतिहासिक मोर्चा
02:01
Video thumbnail
Latur|रेणापूर तहसील कार्यालयासमोर संभाजी सेनेचे आंदोलन
01:25
Video thumbnail
LIVE-लातुरात आज आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात एल्गार!
02:41
Video thumbnail
Latur|फुटबॉलसाठी लातूर सज्ज... सुरू झाली आंतरराष्ट्रीय मैदानांची उभारणी!
03:59
Video thumbnail
LIVE-लातुरात आज आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात एल्गार!
06:53
Video thumbnail
Latur|शेतात जाण्यासाठी रस्ताच नाही; न्यायासाठी आमरण उपोषण
01:51
Video thumbnail
Latur|लातुरात आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात आज महामोर्चा!
03:36
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये उबाठाचे रामरक्षा आंदोलन; दानप्रकरणावर संताप
02:44
Video thumbnail
Nanded|रेल्वे गाड्यांच्या उद्घाटनापूर्वी उबाठा पदाधिकाऱ्यांना पोलिसांच्या नोटिसा
01:10
Video thumbnail
'मिसिंग लिंक'वर पावसाचा फटका; दरड कोसळल्यानंतर ढिगारा उपसण्याचे काम युद्धपातळीवर सुरू
00:41
Video thumbnail
मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने केली तिसरी लग्नगाठ; गौरी स्प्रॅटसोबतच्या लग्नाचा व्हिडिओ व्हायरल.
00:48

Latest news