इलेक्शन कमिशनमधील अंतर्गत वाद हा धक्कादायक; सुळेंची रोखठोक प्रतिक्रिया

बारामती : प्रतिनिधी
केंद्रीय निवडणूक आयोगातील मतभेद चव्हाट्यावर आले असून, मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कारभाराबाबत त्यांच्या दोन सहका-यांनी कॅबिनेट सचिवांकडे थेट तक्रार केल्याचे समोर आले आहे. यासोबतच एसआयआर प्रक्रियेवरून करण्यात आलेल्या दाव्यांवरून विरोधकांनी रान पेटवले आहे.

निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा का? यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, एका सशक्त लोकशाहीसाठी आजची बातमी अर्थातच धक्कादायक आहे म्हणजे मला विश्वासच बसत नाहीये की अरे बापरे आपल्यासारख्या देशामध्ये जिथे जगामधली सगळ्यात मोठी लोकशाही म्हणून भारताकडे बघितलं जातं महात्मा गांधींनी आणि असंख्य कुटुंबांनी एवढा मोठा लढा उभा केला स्वातंत्र्य देण्यासाठी.

स्वातंत्र्य दिल्यानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी एक संविधान आणि समतेची भाषा आणि समान अधिकार प्रत्येकाला मिळावा म्हणजे कॅमेरामनला पण एक मत, रिपोर्टरला पण एक मत, मलाही एक मत, या देशाच्या प्रधानमंत्र्यांनाही एकच मत, अशी प्रक्रिया करून प्रत्येक नागरिकाला एकाच मताचा अधिकार हा संविधानाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना दिला. त्यातून इलेक्शन कमिशनची स्थापना झाली.

पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, इलेक्शन कमिशनमध्ये आम्ही आणि उद्धवजींनी काय भोगलंय, हे मला काही काढायचं नाही. आज मला काही उणीदुणी काढत बसायची नाहीत. पण तो विषय त्याच्यामुळे आम्ही खूप भोगलं आणि त्याच इलेक्शन कमिशनने जे संविधानाच्या चौकटीत चालायला पाहिजे त्यातला अंतर्गत कलह हा ज्या पद्धतीने बाहेर आलाय हा धक्कादायक आहे आणि कुठल्याही सशक्त लोकशाहीला मोडून काढण्याच्या पापाची सुरुवात आहे. हे खूप चिंताजनक आहे. ही प्रक्रिय कुठल्याही सशक्त लोकशाहीसाठी अतिशय हानिकारक आहे.

एक सर्वसामान्य मायबाप जनता ज्याला संविधानिक अधिकार ज्याला बेसिक राईट जो त्याचा अधिकार आहे त्याच्यात जर गल्लत होत असेल आणि ही माहिती जर बाहेर येत असेल ते अतिशय चिंताजनक आहे. म्हणजे मला असं वाटतं हा विषय आपण खूप गांभीर्याने घेतला पाहिजे. हा पॉलिटिकल नाही मला याच्यात राजकारण आणायचंच नाही.

दुष्काळाच्या वेळी कुठलेही राजकारण नको
महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दौरे करत आहेत. यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, हा अत्यंत संवेदनशील विषय आहे. उशिरा का होईना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दौ-यावर जाणार आहेत, त्यांचे स्वागत आहे. शरद पवार यांच्या पत्रानंतर हे दौरे सुरू झाले आहेत. आमचे रोहित पवार, जयंत पाटील, अनिल देशमुख शेतक-याच्या बांधावर आहेत. उद्धव ठाकरे देखील शेतक-याच्या बांधावर आहेत. सरकारच्या दौ-यातून शेतक-­याच्या पदरात काही तरी ठोस पडले पाहिजे. दुष्काळाच्या वेळी कुठलेही राजकारण न करता शेतक-यांना मदत करण्याचे आवाहन सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
🔴 LIVE - एकमत कार्यालयातील गणरायाची आरती |EKMAT DIGITAL
12:44
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये सफाई कामगारांचा ‘झाडू मोर्चा’; ईपीएफची रक्कम देण्याची मागणी
02:02
Video thumbnail
Latur|शासन निर्णयाची होळी! ग्रामरोजगार सहाय्यकांचा थेट इशारा
03:28
Video thumbnail
Latur|तुटपुंजी मदत नको! शेतकऱ्यांना भरीव मदतीची मागणी
06:34
Video thumbnail
Latur| देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांच्या बांधावर; मुख्यमंत्र्यांच्या घोषणेवर शेतकऱ्यांनी थेटच बोलले
10:40
Video thumbnail
CM Devendra Fadanvis|दोन दिवसांत जीआर! दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांची घोषणा
05:52
Video thumbnail
🔴 LIVE मुख्यमंत्री फडणवीस आज लातूर दौऱ्यावर; शेतकऱ्यांच्या तीव्र प्रतिक्रिया| Ekmat Digital
12:19
Video thumbnail
🔴 LIVE मुख्यमंत्री फडणवीस आज लातूर दौऱ्यावर; नुकसानग्रस्त शेतीची पाहणी| Ekmat Digital
28:13
Video thumbnail
Latur|मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर; शेतकऱ्यांना दिलासा मिळणार का?
02:12
Video thumbnail
Latur|पाणी चोरी थांबवण्यासाठी मनपाची कारवाई; ग्रामस्थ आक्रमक
01:54
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांची आरती | Ekmat Digital
12:38
Video thumbnail
Latur|मोईजभाई शेख यांच्या निधनाने लातूर हळहळले; अंत्यदर्शनासाठी गर्दी
05:19
Video thumbnail
Latur|काँग्रेस-राष्ट्रवादीचे बेरोजगार आंदोलन करत आहेत’; अभिमन्यू पवारांचा दावा
10:32
Video thumbnail
Latur|उद्योजक अक्षय शाह यांच्या हस्ते एकमत परिवारातील श्रीगणेशाची आरती
04:04
Video thumbnail
Latur|ज्येष्ठ काँग्रेस नेते मोईजभाई शेख यांचे दुःखद निधन
01:29

Latest news