मंत्री गिरीश महाजनांच्या ताफ्यासमोर अपघात; स्वत: धाव घेत केले बचावकार्य

नाशिक: प्रतिनिधी
दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी करण्यासाठी नाशिक जिल्ह्याच्या दौ-यावर असलेले पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या ताफ्यासमोर पिंपळगाव परिसरात दोन ट्रकचा अपघात झाला. एका ट्रकचे अचानक टायर फुटल्याने तो नियंत्रणाबाहेर जाऊन दुस-या ट्रकवर आदळला.

अपघातग्रस्त ट्रकमध्ये चालक, क्लिनरसह काही जण अडकले होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत महाजन यांनी मदतकार्याला सुरुवात केली. स्वत: ट्रकवर चढून आत अडकलेल्या जखमींना बाहेर काढण्यासाठी त्यांनी मदत केली. यावेळी त्यांच्या सहका-यांसह उपस्थित नागरिकांनीही बचावकार्यात हातभार लावला.

जखमींना बाहेर काढल्यानंतर त्यांना विलंब न करता वैद्यकीय उपचार मिळावेत, यासाठी पालकमंत्र्यांनी तातडीने व्यवस्था केली. शासकीय वाहनातून जखमींना रुग्णालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले. अपघातस्थळी उपस्थित असलेल्या प्रशासनातील अधिकारी व कर्मचा-यांनाही आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. यावेळी आमदार गोकुळ गिते, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह प्रशासनातील अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

दुष्काळ पाहणीचा दौरा थांबवून माणुसकीला प्राधान्य
नाशिक जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री महाजन यांचा दौरा सुरू असताना हा अपघात झाला. शेतकरी आणि ग्रामीण भागातील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी निघालेला हा दौरा काही काळ थांबवत त्यांनी प्रथम अपघातग्रस्तांच्या मदतीला प्राधान्य दिले. अपघातस्थळी केवळ सूचना देऊन न थांबता प्रत्यक्ष बचावकार्यात सहभागी होत जखमींना बाहेर काढण्यासाठी मदत केल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले. मंत्री महाजन स्वत: ट्रकच्या केबिनमध्ये चढून अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
🔴 LIVE - एकमत कार्यालयातील गणरायाची आरती |EKMAT DIGITAL
12:44
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये सफाई कामगारांचा ‘झाडू मोर्चा’; ईपीएफची रक्कम देण्याची मागणी
02:02
Video thumbnail
Latur|शासन निर्णयाची होळी! ग्रामरोजगार सहाय्यकांचा थेट इशारा
03:28
Video thumbnail
Latur|तुटपुंजी मदत नको! शेतकऱ्यांना भरीव मदतीची मागणी
06:34
Video thumbnail
Latur| देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांच्या बांधावर; मुख्यमंत्र्यांच्या घोषणेवर शेतकऱ्यांनी थेटच बोलले
10:40
Video thumbnail
CM Devendra Fadanvis|दोन दिवसांत जीआर! दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांची घोषणा
05:52
Video thumbnail
🔴 LIVE मुख्यमंत्री फडणवीस आज लातूर दौऱ्यावर; शेतकऱ्यांच्या तीव्र प्रतिक्रिया| Ekmat Digital
12:19
Video thumbnail
🔴 LIVE मुख्यमंत्री फडणवीस आज लातूर दौऱ्यावर; नुकसानग्रस्त शेतीची पाहणी| Ekmat Digital
28:13
Video thumbnail
Latur|मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर; शेतकऱ्यांना दिलासा मिळणार का?
02:12
Video thumbnail
Latur|पाणी चोरी थांबवण्यासाठी मनपाची कारवाई; ग्रामस्थ आक्रमक
01:54
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांची आरती | Ekmat Digital
12:38
Video thumbnail
Latur|मोईजभाई शेख यांच्या निधनाने लातूर हळहळले; अंत्यदर्शनासाठी गर्दी
05:19
Video thumbnail
Latur|काँग्रेस-राष्ट्रवादीचे बेरोजगार आंदोलन करत आहेत’; अभिमन्यू पवारांचा दावा
10:32
Video thumbnail
Latur|उद्योजक अक्षय शाह यांच्या हस्ते एकमत परिवारातील श्रीगणेशाची आरती
04:04
Video thumbnail
Latur|ज्येष्ठ काँग्रेस नेते मोईजभाई शेख यांचे दुःखद निधन
01:29

Latest news