महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूक रद्द करा

मुंबई : प्रतिनिधी
निवडणूक आयोगाबाबत ‘इंडियन एक्स्प्रेस’ने मोठा गौप्यस्फोट केला आहे. निवडणूक आयोगात एकवाक्यता नसल्याचे समोर आले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या काही निर्णयांवर दोन्ही निवडणूक आयुक्तांनी काही आक्षेप घेतले होते. ही बाब समोर येताच काँग्रेसने आज पत्रकार परिषद घेऊन दिल्ली आणि हरियाणातील विधानसभेच्या झालेल्या निवडणुका रद्द करा, अशी मागणी केली आहे.

उद्धव ठाकरे यांनी सुद्धा आज पत्रकार परिषद घेऊन मुख्य निवडणूक आयुक्तांवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. ‘‘देशांतर्गत, पक्षांतर्गत लोकशाही कशी राबवली जाते की नाही हे बघणारा निवडणूक आयुक्त नेमणुकीद्वारे नेमला जातो. त्याची निवडणूक का होत नाही?. मग हा कोणाच्या मर्जीने नेमला जातो? कोण नेमतो याला? मर्जीने याची नेमणूक होत असेल तर त्यांच्या घरचं पाणी भरणार. तो पाणी भरताना इतकं पाणी भरतोय की त्यात देशाची लोकशाही बुडतेय’’ असे उद्धव ठाकरे म्हणाले.

‘‘मी निवडणूक आयोगाला धन्यवाद देतो. सुखबीर संधू आणि विवेक जोशी यांना, तुम्ही धाडस दाखवलं. आता तुमच्या लक्षात येत असेल, म्हणून मी विचारलं, तुम्ही सगळे चॅनलवाले पत्रकार परिषदा दाखवता का? चॅनलने त्या भयातून बाहेर येणं गरजेचं आहे. आता जनता रस्त्यावर उतरली तर मात्र काही सांगता येत नाही. तुम्ही लोकशाहीचे आधारस्तंभ आहात. लोकशाहीचा होत असलेला हा खून, पक्ष फोडणारी दरोडेखोरांची टोळी याचा पर्दाफाश जनतेसमोर आला पाहिजे’’ असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

निवडणूक आयुक्तांनी भांडं फोडलेलं आहे
मी चॅनलना विचारतोय तुमच्यात एकमत करा. लोकशाही वाचवा. आम्ही लढतच आहोत. आम्ही विरोधी पक्ष जनतेचे प्रतिनिधी आहोत. जनता आता नुसती ‘मन की बात’ ऐकणार नाही’’ असे उद्धव ठाकरे म्हणाले. ‘‘आपल्या विधानसभा निवडणुका झाल्या, त्यावेळी बेकायदेशीर सरकार होते. निवडणूक आयुक्तांनी भांडं फोडलेलं आहे. कसा मनमानी कारभार चालत होता. पश्चिम बंगालमध्ये ९० लाख मतदार वगळले. महाराष्ट्रात ४५ लाख मतदार घुसवले. ४० लाखांवर आक्षेप घेतला होता. मी, राज आम्ही मविआने मोर्चा काढलेला असे उद्धव ठाकरे म्हणाले.

ज्ञानेशकुमारला तात्काळ तुरुंगात टाकले पाहिजे
इथल्या निवडणूक आयुक्तांना विचारलं, ते बोलतात आमच्याकडे पॉवर नाही. मग पॉवर कोणाकडे आहे? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारलं. ‘‘म्होरक्या कोण आहे? ज्ञानेशकुमारला तात्काळ तुरुंगात टाकलं पाहिजे, मग त्याच्या म्होरक्याला तुरुंगात टाकून या सगळ्या प्रक्रियेचा पुनर्विचार झाला पाहिजे. महाराष्ट्र, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालच्या निवडणुका रद्द करून इथल्या निवडणुका बॅलेट पेपरवर झाल्या पाहिजेत. विरोधी पक्षात मतभेद असले तरी बॅलेट पेपरच्या मुद्यावर एकत्र आलं पाहिजे’’ अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
🔴 LIVE - एकमत कार्यालयातील गणरायाची आरती |EKMAT DIGITAL
12:44
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये सफाई कामगारांचा ‘झाडू मोर्चा’; ईपीएफची रक्कम देण्याची मागणी
02:02
Video thumbnail
Latur|शासन निर्णयाची होळी! ग्रामरोजगार सहाय्यकांचा थेट इशारा
03:28
Video thumbnail
Latur|तुटपुंजी मदत नको! शेतकऱ्यांना भरीव मदतीची मागणी
06:34
Video thumbnail
Latur| देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांच्या बांधावर; मुख्यमंत्र्यांच्या घोषणेवर शेतकऱ्यांनी थेटच बोलले
10:40
Video thumbnail
CM Devendra Fadanvis|दोन दिवसांत जीआर! दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांची घोषणा
05:52
Video thumbnail
🔴 LIVE मुख्यमंत्री फडणवीस आज लातूर दौऱ्यावर; शेतकऱ्यांच्या तीव्र प्रतिक्रिया| Ekmat Digital
12:19
Video thumbnail
🔴 LIVE मुख्यमंत्री फडणवीस आज लातूर दौऱ्यावर; नुकसानग्रस्त शेतीची पाहणी| Ekmat Digital
28:13
Video thumbnail
Latur|मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर; शेतकऱ्यांना दिलासा मिळणार का?
02:12
Video thumbnail
Latur|पाणी चोरी थांबवण्यासाठी मनपाची कारवाई; ग्रामस्थ आक्रमक
01:54
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांची आरती | Ekmat Digital
12:38
Video thumbnail
Latur|मोईजभाई शेख यांच्या निधनाने लातूर हळहळले; अंत्यदर्शनासाठी गर्दी
05:19
Video thumbnail
Latur|काँग्रेस-राष्ट्रवादीचे बेरोजगार आंदोलन करत आहेत’; अभिमन्यू पवारांचा दावा
10:32
Video thumbnail
Latur|उद्योजक अक्षय शाह यांच्या हस्ते एकमत परिवारातील श्रीगणेशाची आरती
04:04
Video thumbnail
Latur|ज्येष्ठ काँग्रेस नेते मोईजभाई शेख यांचे दुःखद निधन
01:29

Latest news