26 C
Latur
Monday, May 13, 2024
Homeलातूरउदगीर-जळकोट मतदारसंघात काँग्रेसमय वातावरण

उदगीर-जळकोट मतदारसंघात काँग्रेसमय वातावरण

जळकोट : प्रतिनिधी
काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांची लातूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजीराव काळगे यांच्या प्रचारार्थ उदगीर येथे दि. २७ एप्रिल रोजी सभा पार पडली. प्रचंड ऊन असतानाही ४१ अंश सेल्सिअस तापमान असतानाही या सभेला नागरिकांची गर्दी झाली होती. प्रियंका गांधी यांच्या सभेमुळे उदगीर जळकोट मतदारसंघामध्ये काँग्रेसमय वातावरण झालेले आहे.

काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्या प्रियंका गांधी यांच्या सभेसाठी सभेसाठी स्वयंस्फूर्तपणे नागरिकांची उपस्थिती होती. दुपारी तीन ला आयोजित असलेली सभा साडेचार वाजता सुरू झाली, प्रियंका गांधी यांचे भाषण साडेचार वाजता सुरू झाले तोपर्यंत सभामंडपामधील एकही व्यक्ती जागेवरून हलला नाही हे या सभेचे वैशिष्ट्य होते . सभा संपल्यानंतर नागरिक हे एकमेकाशी हितगुज करताना प्रियंका गांधी यांच्या भाषणाचीच चर्चा करत होती .प्रियंका गांधी यांनी त्यांचे भाषण हे अतिशय मुद्देसूद पणे मांडले , सध्या सुरू असलेली महागाई, नोकरीसाठी भटकंती करणारा युवक, शेतक-यांच्या शेतीमालाला नसलेला भाव, जीएसटीच्या माध्यमातून सर्वसामान्यांची होत असलेले लूट, वाढलेले पेट्रोल आणि डिझेलचे भाव , वाढलेले गॅसचे भाव, याविषयी मार्गदर्शन केले .

यासोबत काँग्रेसचे सरकार आल्यानंतर प्रत्येक गरीब कुटुंबातील महिलेला वर्षाला एक लाख रुपये देणार, शेतक-याांना आवश्यक असलेल्या वस्तूवर लावण्यात आलेला जीएसटी कर रद्द करणार , डीग्री घेतलेल्या प्रत्येक युवकाला सरकारी नोकरी देणार, शेतक-यांना कर्जमाफी देणार , जेव्हा शेतक-यांंना कर्जमाफीची गरज असेल तेव्हा त्यांना देण्यासाठी आयोगाची स्थापना करणार , शेतक-यांना एम एस सी प्रमाणे शेतीमालाला भाव देणार असे अनेक आश्वासन त्यांनी यावेळी दिले
काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी त्यांच्या भाषणाची सुरुवात राष्ट्रसंत शिवंिलग शिवाचार्य महाराज यांच्या नामस्मरणाने केली. या सभेमध्ये त्यांनी माजी मुख्यमंत्री लोकनेते विलासराव देशमुख यांची देखील आठवण काढली. भाषण झाल्यानंतर प्रियांका गांधी यांनी सुरक्षा कवच तोडून सभा मंडपामध्ये उपस्थित महिलांना भेटल्या, त्यांच्यासोबत सेल्फी काढली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR