30.1 C
Latur
Friday, May 17, 2024
Homeमनोरंजनसिध्दार्थ आनंद करणार ‘क्रिश ४ ’चे दिग्दर्शन

सिध्दार्थ आनंद करणार ‘क्रिश ४ ’चे दिग्दर्शन

मुंबई : बॉलिवूड स्टार हृतिक रोशनचे चाहते ‘क्रिश ४’ ची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र क्रिश ४ या चित्रपटाबाबत चाहत्यांना नवीन अपडेट अनेक दिवसांपासून मिळाली नव्हती. दरम्यान आता या चित्रपटाची नवीन अपडेट समोर आली आहे, त्यामुळे प्रेक्षकांचा आनंद व्दिगुणित होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, क्रिश ४ चे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करू शकतो.

हृतिक रोशन आणि सिद्धार्थ आनंद यांनी यापूर्वी अनेकदा एकत्र काम केले आहे. या दोघांनी बँग बँग, वॉर आणि फाइटर या चित्रपटामध्ये एकत्र काम केले होते. यातील वॉर आणि फायटर ह्या दोन चित्रपटाला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला होता. बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटांनी कोट्यावधी रुपयांचा गल्ला जमवला होता. या वर्षी मार्च महिन्यात बातमी आली होती की हृतिक रोशन २०२५ मध्ये क्रिश ४ चे शूटिंग सुरू करणार आहे. हृतिक त्याचे वडील राकेश रोशन यांच्यासोबत चित्रपटाच्या कथेवर काम करत आहे. दोघांनाही या वर्षाच्या अखेरीस क्रिश ४ ची कथा फायनल करायची आहे. हृतिक रोशन सध्या वॉर २ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

हृतिक रोशनला पुन्हा एकदा सुपरहिरोच्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. क्रिश ४ ची कथा उत्तम असावी असे चित्रपट निर्मात्याला वाटते. त्यामुळे चांगली कथा तयार होण्यासाठी खूप वेळ लागत आहे. २००३ मध्ये ‘कोई मिल गया’ या चित्रपटाचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता.त्यात हृतिक आणि प्रिती झिंटा मुख्य भूमिकेत होते. यानंतर २००६ मध्ये दुसरा आणि २०१३ मध्ये क्रिश ३ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR