‘एआय’ नव्हे रोबोट्स घेणार जागा; ‘अ‍ॅमेझॉन’चे ५ लाख जॉब्स जाणार

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
अमेरिकेतील जॉब मार्केटमध्ये अ‍ॅमेझॉन या टेक जायंट कंपनीने गेल्या दशकभरात जेवढे योगदान दिले आहे त्याच्या जवळपासही कोणी नाही. मात्र आता लाखो हातांना काम देणा-या या अ‍ॅमेझॉन कंपनीच्या अंतर्गत धोरणात्मक कागदपत्र आणि मुलाखतींमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यानुसार अ‍ॅमेझॉन कंपनीने ऑटोमेशनवर भर दिला असून तब्बल कंपनीतील ५ लाखापेक्षा जास्त जॉब्स हे रोबोट्स रिप्लेस करतील.

अ‍ॅमेझॉनची अमेरिकेतील वर्कफोर्स ही २०१८ पासून तिप्पट झाली आहे. त्यांच्याकडे सध्या अमेरिकेत जवळपास १२ लाख लोकं काम करतात. कंपनीच्या वरिष्ठ अधिका-यांनी संचालकीय मंडळाला गेल्या वर्षी कागदपत्र सादर केली होती. यात नवीन नोकरभरती करण्याऐवजी ऑटोमेशनवर (स्वयंचलन) भर देण्याबाबत सुतोवाच करण्यात आले होते. यामुळे साधारण प्रत्येक डिलिव्हरीमागे किमान ३० सेंट्सपेक्षा जास्त पैशांची बचत होणार आहे. एवढंच नाही तर ते २०३३ पर्यंत आतापेक्षा जवळपास दुप्पट प्रॉडक्ट्सची विक्री करू शकतात.

अ‍ॅमेझॉनने मानवी कर्मचारी कमी करून रोबोट्सद्वारे काम करून घेण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. यात उत्पादनही दुप्पट होईल. यासाठी २०३३ पर्यंत कंपनीला जी ६ लाख कामगारांची आवश्यकता होती ती राहणार नाही. म्हणजेच या ६ लाख कामगारांचं काम रोबोट्स करतील. कंपनीच्या वेअरहाऊसमधील (गोदाम) ७५ टक्के कामांचं ऑटोमेशन करून कमीत कमी मनुष्यबळ नेमायचे, असे संकेत कंपनीच्या कागदपत्रांवरून मिळत आहेत.

अ‍ॅमेझॉनचं अनुकरण इतर कंपन्याही करणार?
अमेरिकेत वेअरहाऊस आणि डिलिव्हरी या दोन क्षेत्रांमध्ये रोजगाराचे प्रमाण वाढले आहे. हे ब्ल्यू कॉलर जॉब म्हणून ओळखले जातात. अ‍ॅमेझॉनच्या ऑटोमेशनचा या दोन क्षेत्रांवर सर्वात मोठा परिणाम होऊ शकतो. अमेरिकेत अ‍ॅमेझॉन, वॉलमार्ट या मोठ्या कंपन्या असून अ‍ॅमेझॉनच्या निर्णयाचे अनुकरण इतर कंपन्याही करू शकतील आणि शेवटी ‘ब्ल्यू कॉलर जॉब’ करणा-यांवर बेरोजगारीची कु-हाड कोसळणार, अशी भीतीही व्यक्त होत आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
वर्धापन दिन । पुरोगामी विचाराचे एकमत
02:39:31
Video thumbnail
LATUR|एकमतच्या 35 व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने सत्त्कारमूर्तींच्या प्रतिक्रिया
21:01
Video thumbnail
Nanded|शेतात मोठा खड्डा अन् आत देवीची मूर्ती! नायगावमध्ये नेमकं गूढ काय?
00:52
Video thumbnail
Latur|लातूर RTO मध्ये एजंटची दादागिरी? थेट इन्स्पेक्टरला लाथाबुक्क्यांनी मारहाण!
03:18
Video thumbnail
Latur|शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नासाठी ‘शुभमंगल’ योजना आणण्याचा प्रयत्न - धिरज देशमुख
08:10
Video thumbnail
CHAKUR|महिला सक्षमीकरणात विशेष योगदान-ज्योतीताई स्वामी
04:32
Video thumbnail
RENAPUR|ग्रामीण प्रशासनातील आदर्श अधिकारी तानाजी यादव
04:43
Video thumbnail
UDGIR|साहित्य शिक्षण ,सांस्कृतिक क्षेत्रात अनिता येलमटे यांचे योगदान
03:05
Video thumbnail
UDGIR|दुष्काळाच्या मातीत शिक्षणाची गंगा प्राचार्य सूर्यकांत चवळे
04:08
Video thumbnail
UDGIR|सेवाभाव,संवेदनशीलता समर्पणाचा आदर्श-डॉ प्रियांका राठोड
02:49
Video thumbnail
UDGIR|गावच्या मातीचा सुगंध बाल भारतीच्या पाठयपुस्तकात रसूल पठाण यांचा प्रेरणादायी प्रवास
04:01
Video thumbnail
RENAPUR|महेबूब शेख यांची बांधकाम क्षेत्रात यशोगाथा
02:24
Video thumbnail
DEVANI|आधुनिक शेतीचा चमत्कार महेश रबशेट्टे
04:35
Video thumbnail
UDGIR|समाजसेवा,शिक्षण आणि सांस्कृतिक दीप प्रज्वलित ठेवणाऱ्या प्रा.ज्योती कवडेकर
02:35
Video thumbnail
DEVANI|दुष्काळाच्या मातीतून उद्योगाची भरारी;शेतकरी समृद्धीचा अध्याय-बिभीषण भोसले
03:41

Latest news