27.3 C
Latur
Sunday, May 12, 2024
Homeमहाराष्ट्रएकतर माझं कुंकू लावा, नाहीतर त्यांचे तरी...

एकतर माझं कुंकू लावा, नाहीतर त्यांचे तरी…

अजित पवारांचा कार्यकर्त्यांना कडक शब्दात इशारा

बारामती : एकाचे कुंकू लावा माझे तरी, लावा नाहीतर त्यांचे तरी लावा, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कार्यकर्त्यांना इशारा दिला आहे. काही कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या दोन्ही पक्षांमध्ये कधी शरद पवारांसोबत तर, कधी अजित पवारांसोबत दिसतात, असं सांगत अजित पवारांनी त्या कार्यकर्त्यांना कडक शब्दात इशारा दिला आहे. मी असा दावा करणार नाही की १०० टक्के कामे झालं. पण आमच्या हातात ज्यावेळेस सूत्र आली, तेव्हा आम्ही शांत बसलो नाही. मी पुन्हा सांगतो, बाबांनो भावनिक होऊ नका, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

काहीजण दादा आले की, दादांच्या पुढे पण हलगी वाजत असतात. फटाके वाजत असतात आणि दादाला दिसेल, असं पुढे चालत असतात आणि दादांची पाठ फिरली आणि दुसरे आले की, त्यांच्याबरोबर असतात, अरे काय चाललंय तुमचं. एकाचे कुंकू लावा माझे तरी, लावा नाहीतर त्यांचे तरी लावा, हे काय लावलाय चाटाळपणा, नेमकं काय करायचं ते ठरवा, असं म्हणत अजित पवारांनी दोन्ही पवारांच्या मागे पुढे फिरणा-या कार्यकर्त्यांवर निशाणा साधला आहे. बारामतीत सभेदरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR