36.2 C
Latur
Saturday, May 18, 2024
HomeUncategorizedएस. टी.वर चढलेल्या चालकाला विद्युत तारेचा धक्का

एस. टी.वर चढलेल्या चालकाला विद्युत तारेचा धक्का

निलंगा : प्रातिनिधी
वातावरणात अधिक धग वाढल्याने एसटीच्या टपावर झोपण्यासाठी वर गेलेल्या चालकाचा हात विद्युत तारेला लागल्याने चालकाला जोरदार विजेचा धक्का लागला. त्याचा हात जळाला असून त्याच्यावर लातूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने संरक्षणासाठी गडचिरोली येथील पोलिसांचे एक पथक निलंगा येथे दि ४ मे रोजी दाखल झाले. त्याच्या मुक्कामाची व्यवस्था निलंगा शहरालगत असलेल्या जाऊ येथील शासकीय मुलींच्या शाळेत करण्यात आली होती. सध्याच्या कडक उन्हामुळे रात्रीही धग वाढल्याने पोलिसांना घेऊन आलेल्या एसटीचा चालक प्रवीण महादेव पेंडाम वय ३५ वर्षे रा नागपूर हे वस्तीगृहाच्या शेजारी पार्किंगला लावलेल्या एसटीच्या टपावर थंड वातावरणात झोपावे या हेतूने रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास एसटीच्या टपावर गेले. त्यांनी एसटी पार्किंग ज्या ठिकाणी केली होती त्या ठिकाणीच वरच्या बाजूने विद्युत प्रवाहाच्या तारा गेल्या होत्या.

त्या प्रवीण पेंडाम यांच्या लक्षात न आल्याने नकळत त्याचा हात वरती गेला असता त्यांचा हात तारेला स्पर्श होताच त्यांना जोरदार शॉक लागला. एकदम तारांच्या ंिथनगी पाहून सर्वजण धावून आले. सुदैवाने एसटीचे टायर रबरी असल्याने आरतींग न मिळाल्याने विद्युत शॉक लागताच ते गाडीवरच कोसळले. घटनास्थळी इतर कर्मचारी धावून येत तात्काळ त्यांना लातूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, असे निलंगा पोलिसांकडून सांगण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR