ऑलराऊंडर सर गॅरी सोबर्स यांचे निधन

बार्बाडोस : वृत्तसंस्था
क्रिकेट इतिहासातील महान ऑलराउंडर आणि वेस्टइंडीजचे दिग्गज खेळाडू सर गारफील्ड सोबर्स यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले. येत्या २८ जुलै रोजी त्यांचा ९० वा वाढदिवस होता. परंतु त्यापूर्वीच त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनानंतर क्रिकेट वेस्टइंडीजने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सोबर्स यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. सर गारफील्ड सोबर्स यांना जगभरात सर गॅरी सोबर्स या नावानेही ओळखले जाते.

सर गॅरी सोबर्स यांना क्रिकेट इतिहासातील सर्वांत संपूर्ण खेळाडू मानले जाते. त्यांनी फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाड्यांवर असा स्तर प्रस्थापित केला, ज्याचा आदर्श आजही दिला जातो. सोबर्स यांनी अशा काळात क्रिकेट खेळले, जेव्हा वेस्टइंडीजची टीम जागतिक क्रिकेटमध्ये सर्वात मजबूत आणि आक्रमक मानली जात होती. त्यांच्या अष्टपैलू कामगिरीमुळे त्यांचे नाव खेळाच्या इतिहासात सुवर्णअक्षरांनी कोरले गेले आहे.

टेस्ट क्रिकेटमध्ये रचला इतिहास
सर गारफील्ड सोबर्स यांनी सोबर्स यांनी १९५४ ते १९७४ या वीस वर्षांच्या प्रदीर्घ काळात विंडीजचे कसोटी क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व केले. वेस्टइंडीजसाठी ९३ कसोटी सामने खेळले. या दरम्यान त्यांनी १६० डावांमध्ये ५७.७८ च्या उत्कृष्ट सरासरीने ८,०३२ धावा केल्या. त्यांनी आपल्या कसोटी कारकिर्दीत २६ शतके, ३० अर्धशतके, दोन द्विशतके आणि एक त्रिशतक झळकावले. त्यांची नाबाद ३६५ धावांची सर्वोत्तम खेळी तत्कालीन कसोटी क्रिकेटमधील जागतिक विक्रम होती.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|राधिका पाटील यांची काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी घेतली भेट
05:32
Video thumbnail
Latur|मराठवाड्यात दुष्काळसदृश परिस्थितीची चाहूल;शेकडो एकर शेती अजूनही पेरणीविना
02:47
Video thumbnail
EXPLAINER | कुठे अतिवृष्टी तर कुठे दुष्काळ? महाराष्ट्रात पावसाचं असं चित्र का?
03:22
Video thumbnail
Solapur|केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी DYFIचे अन्नत्याग आंदोलन
02:26
Video thumbnail
MNS Andolan|स्मार्ट मीटरची मनसेकडून होळी; सरकारविरोधात संताप
03:13
Video thumbnail
Latur Murder|लातूरमध्ये मध्यरात्री रक्तरंजित थरार; २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू
02:24
Video thumbnail
Shashikant Shinde|"दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत" – शशिकांत शिंदे
04:10
Video thumbnail
Nanded Teacher sucide|धक्कादायक! शिक्षकाची दोन मुलांसह आत्महत्या; स्टेटसमध्ये वरिष्ठांवर गंभीर आरोप
03:56
Video thumbnail
संत गजानन महाराजांच्या पालखीचे तुळजापुरात भक्तिमय वातावरणात आगमन; जिल्हाधिकाऱ्यांकडून जंगी स्वागत
01:54
Video thumbnail
Nanded|MPSC ऑनलाइन परीक्षेविरोधात विद्यार्थ्यांचा एल्गार
00:30
Video thumbnail
Ramdas Athawale ON Sharad Pawar|शरद पवारांनी NDA मध्ये यावे, स्वागतच करू" – आठवले
11:50
Video thumbnail
Latur|द्रोणा डिफेन्स अकॅडमीविरोधात मनसेचे आंदोलन
03:19
Video thumbnail
Latur Doctar Suicide|डॉ. मेहुल राठोड मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट!
02:49
Video thumbnail
Latur|पिस्तुल्या महाराजाचा पोलीस कोठडीत मुक्काम वाढला!
02:05
Video thumbnail
Nanded|पाण्यासाठी महिलांचा एल्गार; घागर घेऊन ग्रामपंचायतीवर धडक!
00:32

Latest news