ओला, उबरला टक्कर देणार सरकारी ‘भारत टॅक्सी‘!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
अ‍ॅप आधारित टॅक्सी सेवेत ओला आणि उबरची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी केंद्र सरकारच्या सहकार विभागाच्या पुढाकाराने देशात लवकरच ‘भारत टॅक्सी’ ही नवीन सेवा सुरू होत आहे. ‘मल्टी-स्टेट सहकारी टॅक्सी कोऑपरेटिव्ह लिमिटेड’ अंतर्गत ही सेवा चालवली जाईल, जी देशातील पहिली सहकारी टॅक्सी सेवा असेल.

पायलट प्रोजेक्ट म्हणून ही सेवा सुरुवातीला दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात आणि उत्तर प्रदेशात सुरू केली जाईल आणि त्यानंतर ती देशभरात विस्तारित केली जाईल.

‘भारत टॅक्सी’चे फायदे : ओला, उबर आणि ‘भारत टॅक्सी’चा सर्वात मोठा फरक म्हणजे, या मॉडेलमध्ये टॅक्सी चालक हे केवळ नोकर नसून ते या सहकारी संस्थेचे सह-मालक असतील. यामुळे नफा थेट चालकांना मिळेल, त्यांची आर्थिक पिळवणूक थांबेल आणि त्यांना व्यवसायात सन्मान मिळेल.

‘नो-कमिशन’ आणि उत्पन्न : ओला-उबरसारख्या कंपन्यांकडून चालकांच्या उत्पन्नातून घेतले जाणारे जास्त कमिशन या सहकारी मॉडेलमध्ये घेतले जाणार नाही. याचा थेट फायदा चालकांना होईल आणि त्यांचे मासिक उत्पन्न वाढेल.

‘नो-सर्ज प्राइसिंग’ : सणासुदीच्या काळात किंवा जास्त मागणी असताना खासगी अ‍ॅग्रीगेटर्सकडून आकारले जाणारे अवाजवी ‘सर्ज प्राइसिंग’ (वाढीव दर) या अ‍ॅपमध्ये असणार नाही. यामुळे प्रवाशांना पारदर्शक आणि परवडणा-या दरात टॅक्सी उपलब्ध होईल.

३०० कोटींचे संस्थात्मक पाठबळ : या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी ३०० कोटी रुपयांचे अधिकृत भांडवल उभारण्यात आले आहे. या सेवेला देशातील आठ प्रमुख सहकारी संस्थांचा भक्कम पाठिंबा आहे, ज्यात अमूल, राष्ट्रीय सहकार विकास महामंडळ, आणि इफको यांसारख्या मोठ्या संस्थांचा समावेश आहे.

व्यवस्थापन : अमूलचे व्यवस्थापकीय संचालक जयेन मेहता यांची या ‘सहकार टॅक्सी’ संस्थेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या वर्षाच्या अखेरीस या अ‍ॅपचे राष्ट्रीय स्तरावर लोकार्पण होण्याची शक्यता आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
वर्धापन दिन । पुरोगामी विचाराचे एकमत
02:39:31
Video thumbnail
LATUR|एकमतच्या 35 व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने सत्त्कारमूर्तींच्या प्रतिक्रिया
21:01
Video thumbnail
Nanded|शेतात मोठा खड्डा अन् आत देवीची मूर्ती! नायगावमध्ये नेमकं गूढ काय?
00:52
Video thumbnail
Latur|लातूर RTO मध्ये एजंटची दादागिरी? थेट इन्स्पेक्टरला लाथाबुक्क्यांनी मारहाण!
03:18
Video thumbnail
Latur|शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नासाठी ‘शुभमंगल’ योजना आणण्याचा प्रयत्न - धिरज देशमुख
08:10
Video thumbnail
CHAKUR|महिला सक्षमीकरणात विशेष योगदान-ज्योतीताई स्वामी
04:32
Video thumbnail
RENAPUR|ग्रामीण प्रशासनातील आदर्श अधिकारी तानाजी यादव
04:43
Video thumbnail
UDGIR|साहित्य शिक्षण ,सांस्कृतिक क्षेत्रात अनिता येलमटे यांचे योगदान
03:05
Video thumbnail
UDGIR|दुष्काळाच्या मातीत शिक्षणाची गंगा प्राचार्य सूर्यकांत चवळे
04:08
Video thumbnail
UDGIR|सेवाभाव,संवेदनशीलता समर्पणाचा आदर्श-डॉ प्रियांका राठोड
02:49
Video thumbnail
UDGIR|गावच्या मातीचा सुगंध बाल भारतीच्या पाठयपुस्तकात रसूल पठाण यांचा प्रेरणादायी प्रवास
04:01
Video thumbnail
RENAPUR|महेबूब शेख यांची बांधकाम क्षेत्रात यशोगाथा
02:24
Video thumbnail
DEVANI|आधुनिक शेतीचा चमत्कार महेश रबशेट्टे
04:35
Video thumbnail
UDGIR|समाजसेवा,शिक्षण आणि सांस्कृतिक दीप प्रज्वलित ठेवणाऱ्या प्रा.ज्योती कवडेकर
02:35
Video thumbnail
DEVANI|दुष्काळाच्या मातीतून उद्योगाची भरारी;शेतकरी समृद्धीचा अध्याय-बिभीषण भोसले
03:41

Latest news