26.7 C
Latur
Friday, February 21, 2025
Homeअंतरराष्ट्रीय‘कल्याणी’च्या तोफेची अमेरिकेला भुरळ; भारत फोर्जने केला करार!

‘कल्याणी’च्या तोफेची अमेरिकेला भुरळ; भारत फोर्जने केला करार!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतीय संरक्षण उद्योगाचे क्षेत्र सातत्याने विस्तारताना दिसत आहे. फिलीपिन्सला ब्रह्मोस क्षेपणास्त्र विकल्यानंतर, आता एका भारतीय कंपनीने थेट अमेरिकेसोबत ऐतिहासिक करार केला आहे. या करारांतर्गत आता अमेरिकेला आधुनिक तोफा पुरवल्या जाणार आहेत. भारत फोर्जची उपकंपनी असलेल्या कल्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टम्स लिमिटेडने (केएसएसएल) मेड-इन-इंडिया अ‍ॅडव्हन्स्ड आर्टिलरी तोफांच्या पुरवठ्यासाठी यूएस-स्थित एएम जनरल सोबत लेटर ऑफ इंटेंट (एलओआय) वर स्वाक्षरी केली आहे. हा करार संयुक्त अरब अमिरातीची राजधानी अबू धाबी येथे झाला. जो संरक्षण उद्योगासाठी एक मैलाचा दगड आहे. भारत अमेरिकेला पहिल्यांदाच अत्याधुनिक तोफांचा पुरवठा करत आहे.

अबू धाबी येथे संबंधित दोन कंपन्यांमध्ये हा करार झाला. या करारानंतर, भारत फोर्जचे चेअरमन तथा मॅनेजिंग डायरेक्टर बाबा कल्याणी म्हणाले, हे आमच्या तांत्रिक क्षमतेचे प्रमाण आहे आणि तोफांच्या बाबतीत जागतिक नेता बनण्याच्या ध्येयाकडे टाकलेले एक मोठे पाऊल आहे. तसेच, हा करार एएम जनरल सारख्या आघाडीच्या जागतिक संरक्षण कंपन्यांमधील आपल्या क्षमतेवरील विश्वास दर्शवतो.

यासंदर्भात बोलताना कल्याणीने म्हटले आहे की, ‘केएसएसएल’मध्ये हे यश मिळविणारी पहिली भारतीय कंपनी ठरल्याचा आम्हाला अभिमान आहे. यातून आधुनिक युद्धासाठी युद्ध-सिद्ध, अत्याधुनिक आर्टिलरी तोफा देण्याची आमची वचनबद्दता दर्शवते.

भारत फोर्जच्या तोफा पूर्णपणे इलेक्ट्रिक ड्राइव्ह सिस्टमद्वारे चालवल्या जातात. ही प्रणाली तोफांना अधिक विश्वासार्ह आणि घातकही बनवते. महत्वाचे म्हणजे, ही तोफ अशा पद्धतीने तयार करण्यात आली आहे की, तिचा देखभाल खर्चही अत्यंत कमी आहे. यामुळे ही तोफ एक अत्यंत लोकप्रिय तोफ बनली आहे.

भारत-५२ ही एक १५५ मिमी, ५२ कॅलिबर टोव्ड हॉवित्झर तोफ आहे. ही तोफ भारतातच डिझाईन आणि विकसित करण्यात आली आहे. ऍडव्हान्स्ड टोव्ड आर्टिलरी गन सिस्टिम (एटीएजीएस) ही एक १५५ मिमी, ५२ कॅलिबर हॉवित्झर तोफ आहे. जी भारत फोर्जने टाटा पॉवर एसईडी आणि डीआरडीओच्या सहकार्याने विकसित केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR