ताडकळस : कळगाववाडी येथे शनिवार, दि.२ मार्च रोजी विकास कामांचे भूमिपूजन भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष ऋषिकेश सकनुर यांच्या हस्ते करण्यात आले. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सदैव अग्रेसर राहणार आहे. भारतीय जनता पार्टीचा विचार आणि वारसा जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी राजकारणात सक्रिय झालो आहे असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
राज्य सरकारच्या ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्या माध्यमातून कळगाववाडी येथे २० लक्ष रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. १० लक्ष रुपये सिमेंट रोड व सुशोभीकरण, १० लक्ष विद्युतीकरण कामांची सुरवात करण्यात आली. यावेळी कळगावचे सरपंच प्रतिनिधी संदीप व्हावळे, उपसरपंच प्रकाश भंडे, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग सकनुर, रामेश्वर सकनुर, उध्दव भंडे, आप्पराव सकनुर, अंगद भूसनर, अतुल भुसनर, ज्ञानोबा भुसनर, देवराव सकनुर, पांडुरंग बरोले, उमाकांत सकनुर, भागवत सकनुर, सचिन मुलगीर यांच्यासह कळगाव व कळगाव वाडी ग्रामस्थ उपस्थित होते.