कुंभमेळ्याच्या बजेटमधून २५ हजार कोटींची उधळपट्टी;संजय राऊतांचे सरकारवर गंभीर आरोप

मुंबई : प्रतिनिधी
नाशिकमध्ये होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यात २५ हजार कोटींची उधळपट्टी होत आहे. विकासकामांच्या निमित्ताने मोठा भ्रष्टाचार होत आहे, असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शनिवारी (२९ ऑगस्ट) केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी (२८ऑगस्ट) नाशिकमध्ये होते. त्यावेळी त्यांच्या सभेला उपस्थिती पाहिली तर नाशिककरांनी मुख्यमंत्र्यांच्या मेळाव्यावर, भाषणावर बहिष्कार टाकल्याचे दिसून येईल, असाही दावा संजय राऊत यांनी केला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले, मुख्यमंत्र्यांकडे आता लोकांनी गांभीर्याने पाहणे सोडले. कुंभमेळ्याचे योग्य नियोजन नसल्याने नाशिकमध्ये कशीही कामे सुरू आहेत आणि नाशिकरांचे हाल होत आहेत, असा आरोप राऊत यांनी केला.

कुंभमेळ्याच्या भ्रष्टाचारावर केवळ विरोधकच टीका करत नाही तर साधूही टीका करत आहेत, असे संजय राऊत यांनी सरकारला सुनावले. नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या निमित्ताने जे ४५ हजार कोटी रुपये बजेट आहे त्यातील किमान २५ हजार कोटी रुपये कुंभमेळा मंत्री आणि त्यांचे अधिकारी उडवणार आहेत. याची सुरुवात झाली आहे, असा गंभीर आरोप यावेळी खासदार संजय राऊत यांनी केला. सरकारला नाशिकमधील खड्डे दिसत नाहीत का? या खड्ड्यांनी घेतलेले बळी दिसत नाहीत का? असे सवाल राऊत यांनी केले. या सरकारची अवस्था महात्मा गांधीजींच्या तीन माकडांप्रमाणे झाली आहे. गांधीजींची माकडे नितीमत्तेची होती. यांची वेगळी आहे. या माकडांना भ्रष्टाचार दिसत नाही, ते भ्रष्टाचारावर बोलणार नाही आणि भ्रष्टाचार पाहात नाहीत. त्यामुळे सरकार काय करत आहे, असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.

जे मुख्यमंत्री राम मंदिरातील दानचोरीवर बोलत नाहीत त्यांना कुंभमेळ्यातील भ्रष्टाचारावर बोलण्याचा अधिकार नाही, असा घणाघाती आरोप यावेळी संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला. ज्यांनी अयोध्येतील राम मंदिरातील दानपेटी लुटली त्यांचेच तुम्ही वारसदार आहात, असा टिकेचा आसडून राऊत यांनी ओढला.

मुख्यमंत्र्यांना खोटे बोलण्यासाठी डिग्री द्यावी लागेल
नाशिकमधील कामांमध्ये कसलेही नियोजन नाही, फक्त टेंडर काढून कंत्राटदारांना कामे देणे एवढेच यांचे काम आहे. १० वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीसांनी नाशिक शहराला दत्तक घेतले होते हे ते विसरले. तेव्हापासून नाशिक शहराची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे यांना मुख्यमंत्री फडणवीसांना खोटे बोलण्यासाठी डिग्री द्यावी लागेल जशी दिल्ली विद्यापीठाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना ‘मास्टर डिग्री इन एन्टायर पॉलिटिक्स’ दिली होती, असे टीकास्त्र संजय राऊत यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur Contractor Sucide|थकीत बिलं आणि गुत्तेदाराची आत्महत्या; घटनेने उडाली खळबळ
02:13
Video thumbnail
Nanded|स्मशानभूमी नाही म्हणून तरुण थेट सरणावर झोपला! नांदेडमध्ये अनोखे आंदोलन
00:39
Video thumbnail
Latur|चिमुकल्यांचा जीव धोक्यात? वडवळ नागनाथच्या अंगणवाडीची धक्कादायक अवस्था
00:58
Video thumbnail
Nanded|नारळी पौर्णिमेला माहूर गडावर भाविकांची अलोट गर्दी; हजारो जण पायी दत्त शिखराकडे
00:39
Video thumbnail
Latur|बुलेटवर फटाका वाजवताय? सावधान! लातूर पोलिसांची थेट कारवाई
01:47
Video thumbnail
Latur|लातूरकरांनो लक्ष द्या! १ सप्टेंबरपासून महामार्गावर हेल्मेट सक्ती;हेल्मेट नाही तर दंड
02:38
Video thumbnail
Nanded Murder|नांदेडमध्ये रक्तरंजित थरार! जुन्या वादातून तरुणाचा खंजरने खून
00:50
Video thumbnail
Latur|नांदगाव ग्रामसभेत मोठा गोंधळ! प्रश्नांवरून सत्ताधारी-विरोधक भिडले
07:02
Video thumbnail
PARBHANI|गौरवाच्या क्षणांची साक्ष... सन्मानार्थींच्या प्रतिक्रिया
31:41
Video thumbnail
NANDED|एकमतच्या सन्मानाची... सन्मानार्थींच्या मनातील भावना
45:46
Video thumbnail
DHARASHIV|गौरवाच्या क्षणांची साक्ष... सन्मानार्थींच्या प्रतिक्रिया
42:06
Video thumbnail
Solapur|एकमत वर्धापन गौरव २०२६... सन्मानार्थींच्या प्रतिक्रिया
28:21
Video thumbnail
वर्धापन दिन । पुरोगामी विचाराचे एकमत - परभणी
02:04:02
Video thumbnail
वर्धापन दिन । पुरोगामी विचाराचे एकमत - नांदेड
02:12:44
Video thumbnail
वर्धापन दिन । पुरोगामी विचाराचे एकमत - धाराशिव
02:10:21

Latest news