38.1 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeलातूरकोकळगाव येथील शाळेस अकरा पुरस्कार

कोकळगाव येथील शाळेस अकरा पुरस्कार

मदनसुरी: वार्ताहर 
निलंगा तालुक्यातील कोकळगाव पश्चिम येथील जिल्हा परिषद शाळेने स्काउट-गाइड जिल्हा मेळाव्यात विविध प्रकारांत सहभाग घेत अकरा पुरस्कारांची कमाई करत आपला दबदबा कायम ठेवला आहे. चाकुर येथे जिल्हा स्काऊट मेळावा पार पडला. कोकळगाव पश्चिम शाळेतील २६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन अकरा पारितोषिकांची कमाई केली.
कब बुलबुल पथकाच्या संचालिका, मुख्याध्यापिका आरती कोल्हे, सहशिक्षक संदीप तिप्पनबोने यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल मुख्याध्यापिका सौ. आरती कोल्हे व सहशिक्षक संदीप तप्पिणबोने यांचा शालेय समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी पालक दयानंद  विठूबोने, महेबुब शेख यांचाही सहकार्याबद्दल सत्कार करण्यात आला  शालेय समितीचे सदस्य वसंतराव मंजुळे यांनी शुभेच्छा दिल्या. यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचे पत्रकार द्रोणाचार्य कोळी यांनी अभिनंदन केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR