चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र परिसरातील पायाभूत सुविधांचे नूतनीकरण करण्याबरोबरच डीपीआर तयार करण्यात येणार

मुंबई : प्रतिनिधी
चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या भटाडी खाणीतून कोळसा वाहतूक करणा-या ‘पाईप कन्व्हेअर बेल्ट’सह परिसरातील जुन्या पायाभूत सुविधांचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत आज दिली.

सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भटाडी खाणीतून कोळसा वाहतूक करणा-या पाईप कन्व्हेअर बेल्ट परिसरात ५ मे २०२६ रोजी आग लागण्याची घटना घडली होती. ही आग कन्व्हेअर बेल्टच्या लोडिंग अथवा अनलोडिंग भागात लागलेली नव्हती. कन्व्हेअर बेल्ट ज्या भागातून जातो, त्या परिसरात अनेक शेतक-यांची शेती आहे. शेतातील अवशेष जाळल्यामुळे लागलेल्या आगीचा परिणाम कन्व्हेअर बेल्ट परिसरावर झाला आणि त्यातून ही घटना घडली. या घटनेत कोणतेही नुकसान झाले नसून आग तातडीने नियंत्रणात आणण्यात यश आले होते. आपत्कालीन प्रतिसाद पथकही अपेक्षित वेळेत घटनास्थळी पोहोचल्यामुळे परिस्थितीवर वेळीच नियंत्रण मिळविणे शक्य झाले.

सदर प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी त्या परिसरातील नागरिकांमध्ये गवत व पीक अवशेष उघड्यावर न जाळण्याबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून आवश्यकतेनुसार जनजागृती करण्यात येईल. त्याचबरोबर जुन्या झालेल्या पायाभूत सुविधा व यंत्रणांचे नूतनीकरण करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी डीपीआर तयार करून टप्प्याटप्प्याने नूतनीकरणाची कामे हाती घेण्यात येतील, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

द्वारकादास शामकुमारतर्फे १८०० वारक-यांची विनामूल्य पंढरपूर वारी 

लातूर : प्रतिनिधी आषाढी एकादशीनिमित्त गेली १५ वर्षांपासुन द्वारकादास शामकुमार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Purna|सुहागण MGNREGA घोटाळा; प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण स्थगित
03:50
Video thumbnail
Latur|एकमत डिजिटलच्या बातमीचा दणका; लातूरमध्ये अवैध सावकारांविरोधात विशेष मोहीम
02:47
Video thumbnail
Latur|लातूरच्या क्रीडा संकुलात लाखो लिटर पाणी वाया; प्रशासन झोपेत?
02:36
Video thumbnail
Latur|जिल्हा परिषदेच्या पहिल्याच जीबीत इलेक्ट्रॉनिक माध्यमांना 'नो एन्ट्री'!
02:20
Video thumbnail
Latur|आयोध्या प्रकरणाचे पडसाद लातुरात; काँग्रेसचे आंदोलन
05:18
Video thumbnail
Latur|लातुरात भारतीय दलित पँथर आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार आंदोलन
03:58
Video thumbnail
इंद्रायणीला पूर: आळंदीतील चारही पूल पाण्याखाली; भाविकांना आळंदीत न येण्याचे देवस्थानचे आवाहन!
01:12
Video thumbnail
LIVE-लातुरात आज आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात एल्गार!
01:23:37
Video thumbnail
Latur|नांदेडमध्ये धाडसी आजीची कमाल; हातात साप घेऊन पोहोचल्या डॉक्टरांकडे
01:48
Video thumbnail
Latur|'उपवर्गीकरण होऊ देणार नाही!' लातुरात निळ्या वादळाचा सरकारला थेट इशारा
02:47
Video thumbnail
LIVE-लातुरात आज आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात एल्गार!
00:00
Video thumbnail
Latur|उपवर्गीकरणाविरोधात ५८ जाती एकवटल्या; लातूरमध्ये ऐतिहासिक मोर्चा
02:01
Video thumbnail
Latur|रेणापूर तहसील कार्यालयासमोर संभाजी सेनेचे आंदोलन
01:25
Video thumbnail
LIVE-लातुरात आज आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात एल्गार!
02:41
Video thumbnail
Latur|फुटबॉलसाठी लातूर सज्ज... सुरू झाली आंतरराष्ट्रीय मैदानांची उभारणी!
03:59

Latest news