बायकोची हत्या करून नवरा फरार; ३५ वर्षांनंतर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

अकोला : प्रतिनिधी
‘कानून के हाथ बहुत लंबे होते है’, असा डायलॉग तुम्ही अनेक हिंदी चित्रपटांमध्ये ऐकला असेल, नेमका त्याचाच प्रत्यय अकोल्यात आला आहे. अकोला पोलिसांनी तब्बल ३५ वर्षांपासून फरार असलेल्या खून प्रकरणातील आरोपीला अटक केली असून या कारवाईची जिल्ह्यात मोठी चर्चा होत आहे. एकनाथ गायकवाड असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सध्या त्याचे वय ७३ वर्षे असून १९९१ मध्ये घडलेल्या पत्नीच्या हत्या प्रकरणात तो मुख्य आरोपी होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ मार्च १९९१ रोजी अकोला शहरातील गौतमनगर परिसरातील जुन्या आरटीओ कार्यालयाजवळ ही धक्कादायक घटना घडली होती. कौटुंबिक वादातून एकनाथ गायकवाडने त्याची पत्नी चित्रलेखा गायकवाडवर कु-हाडीने वार करून तिची निर्घृण हत्या केली होती. त्या वेळी आरोपीचे वय सुमारे ३८ वर्षे होते. घटना घडल्यानंतर एकनाथ गायकवाड फरार झाला होता. त्यानंतर सिव्हिल लाईन पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

तपासादरम्यान आरोपीचा शोध घेण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न करण्यात आले. न्यायालयानेही त्याच्याविरुद्ध कायमस्वरूपी अटक वॉरंट जारी केले होते. मात्र, अनेक वर्षे तो पोलिसांच्या हाती लागला नव्हता. अलीकडेच आरोपी संभाजीनगर जिल्ह्यातील सिडको परिसरात राहत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीची खातरजमा केल्यानंतर खदान पोलिस ठाण्याच्या वॉरंट पथकाने सापळा रचला. पोलिसांनी योग्य वेळी कारवाई करत एकनाथ गायकवाड याला ताब्यात घेतले.

तब्बल ३५ वर्षे फरार असलेल्या आरोपीला अखेर बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले. अटकेनंतर आरोपीला पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. या कारवाईमुळे जुन्या प्रलंबित गुन्ह्यांच्या तपासातही पोलिसांची तत्परता अधोरेखित झाली आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

द्वारकादास शामकुमारतर्फे १८०० वारक-यांची विनामूल्य पंढरपूर वारी 

लातूर : प्रतिनिधी आषाढी एकादशीनिमित्त गेली १५ वर्षांपासुन द्वारकादास शामकुमार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये एक्सपायरी बदलून शेती औषधांचे वितरण? मोठा गौप्यस्फोट
01:08
Video thumbnail
Nanded|पतीनेच पत्नीवर झाडल्या गोळ्या; लोहा शहरात खळबळ!
00:54
Video thumbnail
Purna|सुहागण MGNREGA घोटाळा; प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण स्थगित
03:50
Video thumbnail
Latur|एकमत डिजिटलच्या बातमीचा दणका; लातूरमध्ये अवैध सावकारांविरोधात विशेष मोहीम
02:47
Video thumbnail
Latur|लातूरच्या क्रीडा संकुलात लाखो लिटर पाणी वाया; प्रशासन झोपेत?
02:36
Video thumbnail
Latur|जिल्हा परिषदेच्या पहिल्याच जीबीत इलेक्ट्रॉनिक माध्यमांना 'नो एन्ट्री'!
02:20
Video thumbnail
Latur|आयोध्या प्रकरणाचे पडसाद लातुरात; काँग्रेसचे आंदोलन
05:18
Video thumbnail
Latur|लातुरात भारतीय दलित पँथर आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार आंदोलन
03:58
Video thumbnail
इंद्रायणीला पूर: आळंदीतील चारही पूल पाण्याखाली; भाविकांना आळंदीत न येण्याचे देवस्थानचे आवाहन!
01:12
Video thumbnail
LIVE-लातुरात आज आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात एल्गार!
01:23:37
Video thumbnail
Latur|नांदेडमध्ये धाडसी आजीची कमाल; हातात साप घेऊन पोहोचल्या डॉक्टरांकडे
01:48
Video thumbnail
Latur|'उपवर्गीकरण होऊ देणार नाही!' लातुरात निळ्या वादळाचा सरकारला थेट इशारा
02:47
Video thumbnail
LIVE-लातुरात आज आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात एल्गार!
00:00
Video thumbnail
Latur|उपवर्गीकरणाविरोधात ५८ जाती एकवटल्या; लातूरमध्ये ऐतिहासिक मोर्चा
02:01
Video thumbnail
Latur|रेणापूर तहसील कार्यालयासमोर संभाजी सेनेचे आंदोलन
01:25

Latest news