चाकूर : प्रतिनिधी
दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी करताना काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधी, प्रियांका गांधी वाड्रा तसेच इंडिया’ आघाडीच्या नेत्यांवर करण्यात आलेल्या पोलिस कारवाईच्या निषेधार्थ चाकूर तालुका व शहर काँग्रेसच्या वतीने ‘काळा दिवस’ पाळण्यात आला. यासंदर्भात तहसीलदारांना निवेदन देऊन लोकशाही अधिकारांच्या संरक्षणाची जोरदार मागणी करण्यात आली.
लोकशाही व्यवस्थेत शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणे, शासनावर प्रश्न उपस्थित करणे हा नागरिकांचा आणि जनप्रतिनिधींचा संविधानिक अधिकार आहे. मात्र, दिल्लीत झालेल्या आंदोलनादरम्यान जनप्रतिनिधींवर जी कारवाई करण्यात आली, त्याचा चाकूर तालुका काँग्रेसच्या वतीने तीव्र शब्दात निषेध नोंदवण्यात आला. यावेळी तहसिलदार नरसिंग जाधव यांना निवेदन देऊन निवडणूक आयोगाचे ज्ञानेशकुमार यांनी तात्काळ आपल्या पदांचा राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार, आज केंद्र सरकारच्या हुकूमशाही प्रवृत्तीने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते खा. राहूल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ‘इंडिया’ आघाडीचे खासदार निवडणूक आयोगाकडे निष्पक्षतेची मागणी करण्यासाठी शांततापूर्ण मार्गाने जात असताना त्यांना बळाचा वापर करून अडवण्यात आले.
या हुकूमशाही कृत्याचा निषेध यावेळी करण्यात आला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने आजचा दिवस भारतीय लोकशाहीसाठी “काळा दिवस” म्हणून घोषित केला आहे. या पार्श्वभूमीवर,चाकुर तालुक्यातील तालुका व शहर काँग्रेस कमिटींच्या वतीने देण्यात गुरुवार, दिनांक ८ ऑक्टोबर २०२६ तहसील कार्यालयासमोर केंद्र सरकारच्या या दडपशाहीविरोधात आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या बडतर्फीच्या मागणीसाठी प्रचंड जनआंदोलन व व्यापक निषेध प्रदर्शन करण्यात आले. तालुक्यातील सर्व सेलच्या पदाधिका-यांनी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी ज्ञानेश हटावो, लोकशाही बचाओ, राहूल गांधी तुम आगे बडो हम आपके साथ है, दडपशाही करणा-या सरकारचा धिकार असो, घोषणांनी तहसिल परिसर दणाणून गेला.
निवेदनावर विलासराव पाटील चाकूरकर जिल्हा उपाध्यक्ष कॉग्रेस कमेटी लातूर, अॅड.धनजय कोरे, शहर अध्यक्ष पप्पुभाई शेख, सोशल मिडिया प्रमुख कॉग्रेस सलीम तांबोळी, नरसिंग भुरे, भुजंग अर्जुने, कदीर शेख, बालाजी सूर्यवंशी, बळीराम आयलाने, भगवान मद्दे, गोविंद भिकाणे, घनशाम भालके, राम गुंडवाड यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
















