लातूर : प्रतिनिधी
लातूर शहरातील श्री विशाल नगर परिसरातील भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री साईबाबा मंदिरात राज्याचे माजी मंत्री तथा सहकारमहर्षी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिलीपराव देशमुख यांनी गुरुवारी सहकारी मान्यवरांसह साईबाबांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी साईबाबांची आरतीही केली.
याप्रसंगी रेणा साखर कारखान्याचे माजी चेअरमन यशवंतराव पाटील, मांजरा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अशोक काळे, जागृती शुगरचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे, साई मंदिराचे संचालक व्यंकट गर्जे, एन. आर. पाटील, विकास देशमुख, पंचायत समिती सदस्य बाळासाहेब कदम, मांजरा साखर कारखान्याचे संचालक तात्यासाहेब देशमुख, सुरेश चव्हाण, धर्मपाल पाटील आदी उपस्थित होते. दर्शनानंतर दिलीपराव देशमुख यांनी मंदिर परिसरातील सुरू असलेल्या विविध कामांची पाहणी केली. कामांची माहिती जाणून घेत त्यांनी संबंधितांना आवश्यक त्या सूचना केल्या. मंदिर परिसराच्या विकासासाठी सुरू असलेल्या कामांचा आढावाही त्यांनी घेतला. यावेळी मंदिर संस्थानच्या वतीने माजी मंत्री दिलीपराव देशमुख, यशवंतराव पाटील, लक्ष्मणराव मोरे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मंदिरातील भक्तगण व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
















