35.1 C
Latur
Sunday, May 19, 2024
Homeलातूरजळकोट तालुक्यात ८४ केंद्रांवर ३३६ कर्मचारी दाखल

जळकोट तालुक्यात ८४ केंद्रांवर ३३६ कर्मचारी दाखल

जळकोट : ओमकार सोनटक्के
जळकोट तालुक्यातील ८४ मतदान केंद्रावर लातूर लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया पार पाडणार आहे. जळकोट तालुक्यात एकूण ८४ मतदान केंद्र असून या ठिकाणी ३३६  मतदान अधिकारी आहेत. मतदान केंद्रावर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ९४ पोलीस कर्मचा-यांंची नियुक्ती करण्यात आली आहे.
उदगीर येथून उपविभागीय अधिकारी सुशांत शिंंदे, यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जळकोटच्या तहसीलदार श्रीमती सुरेखा स्वामी, उदगीरचे तहसीलदार राम बोरगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये  जळकोट तालुक्यासाठी नियुक्त करण्यात आलेले ३३६ कर्मचारी रवाना झाले. दुपारच्या सुमारास हे सर्व कर्मचारी साहित्यासह ठरवून दिलेल्या मतदान केंद्रांवर दाखल झाले. आपापल्या केंद्राकडे निघताना सर्व कर्मचारी हे आपल्या जवळील साहित्याची जुळवा – जुळव  करीत असताना उपविभागीय अधिकारी सुशांंत शिंदे यांनी स्वत: मतदान अधिका-या जवळ उपस्थित राहून माहिती घेतली तसेच उपस्थित मतदान अधिका-याांचे कौतुकही केले.
याप्रसंगी नायब तहसीलदार संतोष गुट्टे, राजाभाऊ खरात, अव्वल कारकून सत्यकांत थोंटे , यांच्यासह जळकोट निवडणूक विभागाच्या अनेक कर्मचा-याची उपस्थिती होती .   लातूर लोकसभेसाठी दि ७ मे रोजी मतदान होणार आहे. यासाठी प्रशासनाच्या वतीने पूर्ण तयारी करण्यात येत आहे. विविध पक्षांच्या वतीने प्रचार यंत्रणाही सुरू झाली आहे. यामुळे सर्वांचे लक्ष आता मतदानाकडे लागलेले आहे. जळकोट तालुक्यामध्ये आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ३७१९५ पुरुष मतदार तर ३३९८६ महिला असे एकूण ७१ हजार १८१  मतदार मतदानाचा हक्क बजावणार  आहेत .
  जळकोट तालुक्यातील गाव निहाय महिला व पुरुष मतदारांची संख्या पुढील प्रमाणे आहे . वडगाव – पुरुष २५५, स्त्री २३८  एकुण ४९३, स्वर्गा – पुरुष – १२६, स्त्री – ११२ एकुण – २३८, शेलदरा – पुरुष ५५२ स्त्री – ५०४ एकुण १०५६, उमरगा रेतू – पुरुष ८३३ , स्त्री ७५१ एकुण १५९४ , चेरा – पुरुष ११९८ , स्त्री ११२१ एकुण २३१९, वांजरवाडा – पुरुष १५३९, स्त्री १४५८, एकुण २९९७, होकर्णा – पुरुष ८७१, स्त्री ८१०, एकुण १६८१, उमरदरा – पुरुष – ५९३ स्त्री ५६६  एकुण ११६५९, केकतशिंदगी – पुरुष ६०० स्त्री  ६०६ एकुण १२०६, चाटेवाडी – पुरुष १३२ स्त्री  ११२ एकुण २४४, कुणकी – पुरुष -१००२ स्त्री ९३१  एकुण एकूण १९३३, धामणगाव – पुरुष ९५२, स्त्री ९१३ एकूण १८६५ , जगळपूर – पुरुष १२३३ स्त्री १२८२ एकूण २५१५, जिरगा – पुरुष १७७ स्त्री १९६ एकुण ३७३ , ढोरसांगवी – पुरुष ४३६ स्त्री ३७२ एकूण ८०८, विराळ – पुरुष ४५२ स्त्री ४२५  एकूण ८७७, करजी – पुरुष ६४३ स्त्री ६६२ एकूण १३१६, पाटोदा बु – पुरुष १४०५, स्त्री १३०० एकूण २७०५ , जळकोट – पुरुष ४११४ स्त्री ३०१० एकूण ८०५१, हळदवाढवणा – पुरुष ४२७ स्त्री ३७६ एकूण ५४९, रावण कोळा – पुरुष १२७४  स्त्री ११२६ एकूण २४००, माळहिप्परगा – पुरुष १२०० स्त्री ११५७  एकूण २४३७,  शिवाजी नगर तांडा – पुरुष २२३ स्त्री १८२ एकूण ४०५, पाटोदा खु – पुरुष ४१५ स्त्री ३८८ एकूण ८०३, कोळनूर – पुरुष ६४० स्त्री ५८० एकूण १२२०, कोनाळी डोंगर – पुरुष ४९०  स्त्री ३९८ एकूण ८९६, सोनवळा – पुरुष -९८३  स्त्री ८२७ एकुण १८१०, धनगरवाडी – पुरुष १८८,  स्त्री १८६  एकूण ३७४, लाळी बु – पुरुष ५१५ स्त्री ४७८ एकूण ९९३, मंगरूळ – पुरुष १११५ स्त्री ८६१ एकूण २०७६,
लाळी खु – पुरुष ४४४, स्त्री ४०१  एकूण ८४५, बेळसांगवी – पुरुष ५०८ स्त्री  ४५९  एकूण ८४५ , येवरी – पुरुष  ४३५ स्री ३८७ एकूण ८२२, बोरगाव – पुरुष ३१८, स्त्री २०८ एकूण ६१६ , एकुर्का – पुरुष ४००, स्त्री ३४० एकूण ७४८, घोणशी – पुरुष १२३२, स्त्री १०८० एकुण २३१२ , खंबाळवाडी – पुरुष १२८, स्त्री ११४ एकुण ४४२, धोंडवाडी – पुरुष २५५ स्त्री २२३ एकूण ४५८, तिरूका – पुरुष ९०५, स्त्री ८०५ एकूण १७१०, डोंगरगाव – पुरुष ५४२ , स्त्री ४६३ एकूण १००५, सुलाळी – पुरुष ६२३ स्त्री ४६३ एकूण १००५, मरसांगवी – पुरुष ९३९, स्त्री ६५८ एकूण १५९७ , अतनुर – पुरुष १३१४, स्त्री ११९० एकूण २५०४, गुत्ती – पुरुष १४२५ , स्री १२५५ एकूण २६८०, फकरुतांडा – पुरुष १०२’ स्त्री ८७ एकूण १८९, गव्हाण – पुरुष ६६४  स्त्री ६१४  एकूण १२७८, मेवापूर – पुरुष ४६८  स्त्री ३९५  एकूण ८६३, शिवाजीनगर तांडा – पुरुष ३३५, स्त्री २०९४ एकूण ६२९,चिंचोली – पुरुष २६२, स्त्री २६५ एकूण ५२७, अग्रवाल तांडा – पुरुष २३७ स्त्री १८८ एकूण ४२५ जळकोट तालुक्यातील या गावे व वाडी तांड्यावर ७११८१ मतदान असून ते आज लोकसभेसाठी आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR