38.7 C
Latur
Sunday, May 19, 2024
Homeनांदेडपंतप्रधान मोदी मंगळवारी नांदेड विमानतळावर

पंतप्रधान मोदी मंगळवारी नांदेड विमानतळावर

नांदेड : काल रविवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे नांदेड विमानतळावर आगमन झाले होते. त्यानंतर मंगळवार दि. ७ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी नांदेडमध्ये येत आहेत.

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवार दिनांक ७ मे रोजी नांदेडमध्ये येत आहेत. तेलंगणातील प्रचाराच्या निमित्ताने या निवडणूक काळात ते तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सायंकाळी सात वाजता शिर्डी विमानतळावरून नांदेड विमानतळावर येणार असून नांदेड विमानतळावरून ते दिल्ली किंवा तेलंगणाकडे रवाना होणार असल्याची माहिती आहे.

नांदेड जिल्ह्यात अति महत्त्वाची व्यक्ती येत असल्याने ड्रोन किंवा ड्रोन सदृश्य वस्तू आकाशात उडविण्यास जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नांदेड विमानतळावर येत असल्याने पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR